(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकलेच ठरले 'बाजीगर', शरद पवार गटाच्या गणेश गितेंचा पराभव
Nashik East Assembly Constituency : 2019 च्या निवडणुकीत उत्तमराव ढिकले यांचे सुपुत्र भाजपचे उमेदवार अॅड. राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांचा 12 हजार मतांनी पराभव केला होता.
नाशिक : मंदिरांची नगरी कुंभनगरी ही नाशिकची खरी ओळख आहे. ही ओळख ज्या परिसरामुळे जगभर झाली तो पंचवटी गोदावरी काठाचा परिसर ज्या भागात मोडतो तो हा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ (Nashik East Assembly Constituency) होय. या मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकले (Rahul Dhikle) हे विद्यमान आमदार आहेत. राहुल ढिकले यांना भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले गणेश गीते (Ganesh Gite) यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले राहुल ढिकले विरुद्ध गणेश गीते या लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत राहुल ढिकले यांनी बाजी मारली आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून राहुल ढिकले सलग दुसऱ्यांचा आमदार झाले आहेत.
राहुल ढिकले 154671
गणेश गीते 67138
राहुल ढिकले 87535 हजार मतांच्या लीडने विजयी
शहरातील तीन मतदारसंघापैकी विस्ताराने मोठा असणारा नाशिक पूर्व मतदारसंघ असून भाजप-शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे. 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत निर्मिती झालेल्या या मतदारसंघात सर्वात पहिले मनसेने आपला झेंडा फडकावला होता. उत्तमराव ढिकले यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवित ४७ हजार ९२४ मते प्राप्त करून विजय संपादित केला होता. 2014 मध्ये मोदी लाट उसळल्याने उत्तमराव ढिकले निवडणुकीपासून दूर राहिले. उमेदवाराच्या भाऊगर्दीत भाजपचे बाळासाहेब सानप तब्बल 78 हजार 554 मते मिळवून विजयी झाले. शिवसेनेचे चंद्रकांत लवटे दुसऱ्या तर काँग्रेसचे उद्धव निमसे तिसऱ्या स्थानी होते. मनसेचे उमेदवार रमेश धोंगडे यांना अवघी 12 हजार 437 मतं मिळाली होती. तर 2019 च्या निवडणुकीत उत्तमराव ढिकले यांचे सुपुत्र भाजपचे उमेदवार अॅड. राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांचा 12 हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत अॅड. राहुल ढिकले यांना 85 हजार 232 मते मिळाली, तर बाळासाहेब सानप यांना 74 हजार 304 मते मिळाली. या निवडणुकीतून नाशिक पूर्व मतदारसंघात पुन्हा एकदा ढिकले घराण्यातून आमदार निवडून आला होता.
राहुल ढिकले यांचा सलग दुसऱ्यांदा विजय
यंदा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार राहुल ढिकले आणि महाविकास आघाडीचे गणेश गीते यांच्यात मुख्य लढत झाली. तर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात एकूण 13 उमेदवार रिंगणात असून दोन जणांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज माघारीनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली होती. पूर्व विधानसभा मतदारसंघ गेल्या दशकापासून भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळाली. या चुरशीच्या लढतीत राहुल ढिकले यांनी बाजी मारली.
आणखी वाचा