बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेदवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर
Rashtriya Samaj Party Candidate List : महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महादेव जानकरांचा पक्ष स्वबळावर विधानसभेच्या रिंगणात उतरला आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. एकीकडे महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. महादेव जानकरांच्या (Mahadev Jankar) राष्ट्रीय समाज पक्षाने 65 उमेदवारांची पहिली यादी (Rashtriya Samaj Party) जाहीर केली आहे.
या यादीत परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमधून पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमधून माजी आमदार बब्रूवान खंदाडे यांना तिकीट देण्यात आले आहे. बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात संदीप चोपडेंना तर कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांच्या विरोधात विकास मासाळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. तसेच मुंबई, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील जागांचा यादीत समावेश आहे. महादेव जानकरांचा पक्ष स्वबळावर विधानसभेच्या रिंगणात उतरला असून उर्वरित उमेदवारांची यादी आज रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महादेव जानकरांच्या 65 उमेदवारांची पहिली यादी
- गंगाखेड - डॉ. रत्नाकर माणिकराव गुट्टे
- अहमदपूर - बब्रुवान खंदाडे
- भोकर - साहेबराव बाबा गोरटकर
- कळम धाराशिव - श्रीहरी वसंत माळी
- परांडा - डॉ. राहुल भीमराव घुले
- परभणी - सावित्री सतीश महामुनी चकोर
- मुखेड - विजयकुमार भगवानराव पेठकर
- हदगाव हिमायतनगर - अॅड. संतोष उत्तमराव टीकोरे
- नायगाव - हनुमंतराव मारोतराव वनाळेकर
- बारामती - संदीप मारुती चोपडे
- अक्कलकोट - सुनील शिवाजी बंडगर
- राहुरी - नानासाहेब पंढरीनाथ जुंधारे
- अंबरनाथ - रुपेश थोरात
- निलंगा - नागनाथ बोडके
- इंदापूर - तानाजी उत्तम शिंगाडे
- देगलूर - श्याम बाबुराव निलंगेकर
- पैठण - प्रकाश उत्तमराव दिलवाले
- वैजापूर गंगापूर - बाबासाहेब कचरू राशिनकर
- कराड उत्तर - सोमनाथ रमेश चव्हाण
- पुरंदर - संजय शहाजी निगडे
- भोर - रामचंद्र भगवान जानकर
- खानापूर आटपाडी - उमाजी मोहन चव्हाण
- कोल्हापूर दक्षिण - विशाल केरू सरगर
- पन्हाळा शाहूवाडी - अभिषेक सुरेश पाटील
- इचलकरंजी - प्रा. सचिन किरण बेलेकर
- सातारा - शिवाजी भगवान माने
- आंबेगाव - योगेश पांडुरंग धरम
- कोथरूड - सोनाली उमेश ससाणे
- कसबा पेठ - शैलेश रमेश काची
- वडगाव शेरी - सतीश इंद्रजीत पाण्डेय
- मागाठाणे - जिवाजी लेंगरे
- जोगेश्वरी पूर्व - विजय पतिराम यादव
- कांदिवली - ओमप्रकाश सोनार
- दिंडोशी - राकेश लालमनी यादव
- नालासोपारा - नरसिंह रमेश आदावळे
- वसई - हरिशंकर शेषनारायण जयस्वाल
- सांगोला - सोमा उर्फ आबा गुलाब मोटे
- वर्सोवा - मेहक चौधरी
- बार्शी - किशोर परमेश्वर गाडेकर
- करमाळा - विकास शिवाजी आलदर
- पनवेल - सुदाम शेठ जरग
- भोसरी - परमेश्वर बुरले
- अकोले - पांडुरंग नानासाहेब पथवे
- साक्री - अनिता धनराज बागुल
- ब्रह्मपुरी - संजय शंकर कन्नवार
- कर्जत - बळीराम एडकर
- देवळी - अश्विनी गोविंद शिरपूरकर
- मलकापूर - प्रवीण लक्ष्मण पाटील
- रिसोड - दीपक श्रीराम तिरके
- अकोला पश्चिम - इमरान मिर्झा
- बाळापुर - विश्वनाथ जावरकर
- सिंदखेडराजा - दत्तू रामभाऊ चव्हाण
- यवतमाळ - धरम दिलीपसिंग ठाकूर
- दिग्रस - डॉ. श्याम फुलसिंग चव्हाण
- उमरखेड - प्रज्ञेश रुपेश पाटील
- बडनेरा - संजय महाजन
- कारंजा मानोरा - संतोष हरिभाऊ दुर्गे
- कामठी - नफीस अब्दुल अलीम शेख
- निफाड - शंकर एकनाथ साबळे
- अकोले - पांडुरंग नानासाहेब पथवे
- शिर्डी- नानासाहेब सोन्याबापू काटकर
- कोपरगाव - शंकर सुखदेव लासुरे
- नेवासा - शशिकांत भागवत मतकर
- कर्जत जामखेड - विकास मिठूलाल मासाळ
- पारनेर- सखाराम मालोजी सरक
आणखी वाचा