एक्स्प्लोर

भाजप स्वबळावर सत्तास्थापनेपासून पाच जागा दूर, एबीपी माझा सीवोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात 60.46 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर एबीपी माझा सी वोटरने निवडणुकीच्या निकालाचा सर्व्हे केला.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात 60.46 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर एबीपी माझा सी वोटरने निवडणुकीच्या निकालाचा सर्व्हे केला. या एक्झिट पोलनुसार शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती 210 (198 ते 222) जागा जिंकण्याची शक्यता आहे. महाआघाडीला 63 (49 ते 75) जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर इतर पक्ष आणि अपक्षांना 15 (4 ते 21) मिळतील. एक्झिट पोलमधील अंदाजानुसार भारतीय जनता पक्ष 140 जागा जिंकेल, तर शिवसेनेला 70 जागा मिळतील. दुसऱ्या बाजूला महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 32 जागा जिंकेल, तर काँग्रेसला 31 जागा मिळतील. इतर पक्ष आणि अपक्षांना 15 जागा मिळण्याची जास्त शक्यता आहे. महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ गरजेचे असते. भारतीय जनता पक्ष 140 जागा जिंकून राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता आहे. परंतु स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला अवघ्या 5 जागांची आवश्यकता भासेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला इतक्या जागा मिळाल्या तर भाजप शिवसेनेला सत्तेत भागिदार करुन घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विभागनिहाय आकडेवारी मुंबई :- महायुती - 31, महाआघाडी - 04, अन्य - 1 कोकण :- महायुती - 32, महाआघाडी - 05, अन्य - 02 मराठवाडा :- महायुती - 28, महाआघाडी - 13, अन्य - 6 पश्चिम महाराष्ट्र :- महायुती - 44, महाआघाडी - 23, अन्य - 3 उत्तर महाराष्ट्र :- महायुती - 26, महाआघाडी - 10, अन्य - 0 विदर्भ :- महायुती - 49, महाआघाडी - 08, अन्य - 03 दरम्यान, भारतीय जनता पक्षाला विदर्भात सर्वाधिक (43) जागा मिळणार आहेत. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही भाजप चांगली मुसंडी मारण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला 33 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मुंबईत महायुतीत शिवसेनेपेक्षा भाजप मोठा भाऊ ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतल्या 36 जागांपैकी 16 जागा भाजपला मिळतील, तर शिवसेनेला 15 जागा मिळतील. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा राज्यातला तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला 32 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यापैकी 16 जागा पश्चिम महाराष्ट्रातल्या असतील. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीला तारणार असल्याचे चित्र आहे. एबीपी माझा सी वोटर एक्झिट पोलमध्ये 41 हजार 146 मतदारांशी चर्चा करुन त्यांची मते जाणून घेण्यात आली. राज्यातल्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघातल़्या 288 विधानसभा मतदारसंघात ही मतदानोत्तर जनमतचाचणी घेण्यात आली एक्झिट पोल किंवा मतदानोत्तर जनमत चाचणी म्हणजे मतदान करुन मतदानकक्षाबाहेर पडलेल्या मतदारांशी पहिल्या पंधरा-वीस मिनिटांमध्ये चर्चा करुन त्याची मते जाणून घेतली जातात, त्यावरुन त्यांचा कल जाणून घेतला जातो. साधारणपणे मतदान केल्यानंतरच्या पहिल्या पंधरा-वीस मिनिटात मतदार खोटं बोलत नाही किंवा तो जो चर्चा करतो त्यावर त्याने केलेल्या मतदानाचा किंवा मतदान करताना केलेल्या विचारांचा प्रभाव कायम असतो, यामुळेच सर्वसाधारण जनमत चाचणीऐवजी मतदानोत्तर जनमतचाचण्यांची आकडेवारी निकालाच्या अधिक जवळ जाणारी मानली जाते. एबीपी माझा सी वोटरच्या या मतदानोत्तर जनमत चाचणीत मार्जिन ऑफ एरर हा मॅक्रो लेवलवर + - 3% तर मायक्रो लेवलवर + - 5% असेल, असं गृहित धरलंय

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
Embed widget