एक्स्प्लोर

Maharashtra Election Results 2024:मराठवाड्यात पोस्टल मतदानात महायुती आघाडीवर, मतमोजणीचे कल येण्यास सुरुवात, कुठे कुणाची सरशी?

Marathwada Region Election Results 2024: मराठवाड्यात पोस्टल मतमोजणीत महायुती आघाडीवर असून भाजप आणि शिंदे गटाला किती जागा मिळतायत पाहूया..

Maharashtra Assembly Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या चुरशीच्या आणि अतितटीच्या लढतीनंतर मराठवाडा विभागाकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीत मराठवाड्याचा पहिला कल हाती आला आहे. मतमोजणीच्या पहिल्या कलात महायुती आघाडीवर असल्याचं समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, हिंगोली अशा बहुतांश भागात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात पोस्टल मतमोजणीत महायुती आघाडीवर असून भाजप आणि शिंदे गटाला आतापर्यंत २४ जागा तर महाविकास आघाडीला  ३ जागा असून इतर पक्षांना १ असे आघाडीचं स्वरुप समोर येत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 तारखेला पार पडले होते. त्यानंतर आज आज मतमोजणी होत आहे. प्रथम पोस्टल मतांची मतमोजणी सुरू होत झाली असून अवघ्या काही क्षणात पहिला कल हाती आला आहे.बहुतांश एक्झीट पोल्सनुसार, मराठवाड्यात महाविकास आघाडी अधिक जागा मिळवू शकते असा अंदाज होता. पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या कलानुसार महायुतीची सरशी होताना दिसत आहे. पोस्टल मतांच्या मोजणीचा पहिला कल भाजपच्या बाजूने गेल्याचे समजते. त्यामुळे महायुतीचे खाते उघडले आहे. पोस्टल मतांच्या मोजणीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस दिसत आहे. काँग्रेस आणि भाजपने पोस्टल मतमोजणीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता ट्रेंड कायम राहणार का, हे बघावे लागेल. पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम यंत्रांमधील मते मोजण्यास सुरुवात होईल. तेव्हा निकालाचे खरे कल समोर येण्यास सुरुवात होईल. मविआने आतापर्यंत दोन जागांवर आघाडी घेतली आहे. तर महायुतीही दोन जागांवर आघाडीवर आहे.

पोस्टल आघाडीत महायुतीची सरशी

मराठवाड्यात लाडकी बहीण, जरांगे फॅक्टरनंतर महायुतीची ताकद वाढणार की महाविकास आघाडी वरचढ ठरणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. दरम्यान मराठवाड्यातील पोस्टल मतमोजणीत महायुती आघाडीवर दिसत आहे. 

नांदेड जिल्ह्यात महायुती आघाडीवर, काँग्रेस अपक्ष किती? 

मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून महायुतीची सरशी होताना दिसत आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील मतमोजणीचे पहिले कल हाती यायला सुरुवात झाली आहे. नांदेड मधील किनवट मध्ये भाजपचे भीमराव केराम आघाडीवर असून भोकरमध्ये भाजपच्या श्रीजया चव्हाण यांचीही सरशी होत आहे. नायगावमध्ये  राजेश पवार तर देगलूर मध्ये जितेश अंतापुरकर मुखेड मध्ये तुषार राठोड हे भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. हदगाव मध्ये काँग्रेसच्या माधव पवारांना आघाडी मिळत असल्याचे दिसतय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या संगीता डक यांना नांदेड उत्तरमधून आघाडी मिळताना दिसत आहे . 

धाराशिव,परभणीमध्ये पहिल्या फेरीत कोणाची आघाडी? 

धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा विधानसभा मतदारसंघातील ताजे कल हाती आले आहेत.  शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तानाजी सावंत पहिला फेरीत आघाडीवर असल्याचे दिसते. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आनंद भरोसे ६२९ मतांनी आघाडीवर असल्याचे समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
Embed widget