Chhatrapati Sambhajinagar Maharashtra Election Results 2024 Winners List: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत कुणाचं पारडं जड? छत्रपती संभाजीनगरच्या विजयी उमेदवारांची यादी,वाचा एका क्लिकवर
Maharashtra Election Results 2024 Winners List: राज्यात 20 तारखेला एकाच टप्प्यात मतदान पार पडलं, मात्र आता आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.
Chhatrapati Sambhajinagar Maharashtra Assembly Election Results 2024:
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत बटेंगे तो कटेंगे, जरांगे फॅक्टर,लाडकी बहीण, पैसेवाटप,गैरव्यवहार,हमीभाव अशा अनेक मुद्द्यांमुळे चर्चेत राहिलेल्या विधानसभेत कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्षं आहे.छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) 9 विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत सुरु आहे.विधानसभेच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली होती. गेल्या 30 वर्षांत झालेल्या निवडणुकींच्या निकालानुसार छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आता २०२४ च्या विधानसभेत चित्र शिंदे vs ठाकरे शिवसेनेच्या लढतीत कोणता उमेदवार जिंकणार हे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
राज्यात 20 तारखेला एकाच टप्प्यात मतदान पार पडलं, मात्र आता आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टप्याटप्याने विविध मतदारसंघातील कल हाती येत आहेत.जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगरच्या कुठल्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहेत.
कोणत्या मतदारसंघात कोण ठरणार विजयी?
1)औरंगाबाद पूर्व मतदारसंघ
लहू शेवाळे (काँग्रेस)
अतुल सावे (भाजप)
इम्तियाज जलील (MIM)
विजयी उमेदवार-अतुल सावे
2)औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ
राजू शिंदे (शिवसेना- यूबीटी)
संजय शिरसाट (शिवसेना)
विजयी उमेदवार- संजय शिरसाट
3)औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ
बाळासाहेब थोरात (शिवसेना- यूबीटी)
प्रदीप जैस्वाल (शिवसेना)
विजयी उमेदवार-प्रदीप जैस्वाल
4)फुलंब्री मतदारसंघ
विलास औताडे (काँग्रेस)
अनुराधा चव्हाण (भाजप)
विजयी उमेदवार- अनुराधा चव्हाण
5)सिल्लोड विधानसभा मतदारसंघ
सुरेश बनकर (शिवसेना- यूबीटी)
अब्दुल सत्तार अब्दुल नबी (शिवसेना)
विजयी उमेदवार- अब्दुल सत्तार
6)गंगापूर मतदारसंघ
सतीश चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी)
प्रशांत बंब (भाजप)
विजयी उमेदवार-प्रशांत बंब
7)वैजापूर मतदारसंघ
दिनेश परदेशी (शिवसेना- यूबीटी)
रमेश बोरनारे (शिवसेना)
विजयी उमेदवार- रमेश बोरनारे
8)पैठण विधानसभा मतदारसंघ
दत्ता गोर्डे (शिवसेना- यूबीटी)
विलास भुमरे (शिवसेना
विजयी उमेदवार- विलास भुमरे
9)कन्नड विधानसभा मतदारसंघ
उदयसिंग राजपूत (शिवसेना- यूबीटी)
संजना जाधव (शिवसेना)
विजयी उमेदवार-संजना जाधव
छत्रपती संभाजीनगरात पक्षीय बलाबल कसे?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ मतदारसंघ आहेत.सिल्लोड, औरंगाबाद मध्य, पश्चिम, पैठण आणि वैजापूर या पाच मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार. औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची आघाडी. आणि कन्नड विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जागा आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठे चुरशीची लढत?
छत्रपती संभाजीनगरच्या ९ मतदारसंघात बहुतांश ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे.पण मराठा मतपेढी कोणत्या शिवसेनेबरोबर जाणार? मुस्लिम बांधवांचा कल कोणाच्या बाजूनं राहणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान, पूर्व औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष आहे. लाडकी बहीण आणि धार्मिक ध्रूविकरणाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पूर्वची लढत चुरशीची होणार आहे. भाजपचे अतुल सावे, MIM चे इम्तियाज जलील आणि काँग्रेसकडून लहू शेवाळे या प्रमुख उमेदवारांमध्ये ही होत आहे. शिवाय कन्नडमध्येही उद्धव ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत विजयी ठरतात की शिंदे गटाच्या संजना जाधव याकडेही राज्याचं लक्ष आहे.