सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे टॉप 10 आमदार कोण? अजित पवार 9 नंबरला तर 'या' उमेदवाराची बाजी
Maharashtra Assembly Election Top 10 MLA : राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या आमदारांमध्ये महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही हे विशेष.
मुंबई : राज्यात 236 ठिकाणी आघाडी घेऊन महायुतीने ऐतिहासिक असं यश मिळवलं आहे. त्यामध्येही भाजपने सर्वाधिक म्हणजे 137 जागांवर आघाडी घेत जोरदार मुसंडी मारल्याचं दिसतंय. महायुतीचे अनेक उमेदवार हे लाखांमध्ये लीड घेऊन निवडून आले आहेत. सर्वाधिक मतं घेणाऱ्या दहा आमदारांमध्ये सर्वच आमदार हे महायुतीचे आहेत. साताऱ्यामधून शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल 1 लाख 42 हजारांचे मताधिक्य घेऊन राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. तर त्या खालोखाल अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी 1.41 लाखांचं मताधिक्य घेतलं
सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील 10 आमदार
1. सातारा मतदारसंघ- शिवेंद्रराजे भोसले (भाजप) - 01 लाख 42 हजार 124 मताधिक्याने विजयी.
2. परळी- धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) - 01 लाख 41 हजार 241 मतांनी विजयी
3. बागलाण- दिलीप बोरसे (भाजप) - 129297 मतांनी विजयी
4. कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (शिवसेना) - 01 लाख 20 हजार 335 मतांनी विजयी
5. कोथरुड - चंद्रकांत पाटील (भाजप)- 1 लाख 12 हजार 41 मतांनी विजयी
6. ओवळा माजीवड - प्रताप सरनाईक (शिवसेना) - 1 लाख 9 हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी..
7. मावळ मतदारसंघ - सुनील शेळके (राष्ट्रवादी) - 01 लाख 08 हजार 565 मतांची विजयी
8. चिंचवड मतदारसंघ - भाजपा उमेदवार शंकर जगताप - ०१ लाख ०३ हजार ८६५ मतांनी विजयी.
9. बारामती मतदारसंघ - राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अजित पवार - 1 लाख 899 मतानी विजयी
10. दादा भुसे, मालेगाव बाह्य (शिंदे गट)= 1,02,440 मताधिक्य
या व्यतिरिक्त मुब्रा कळवा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे 96 हजार 228 मतांनी विजयी झालेत. तर बोरिवली मतदारसंघातील भाजप उमेदवार संजय उपाध्याय हे 95 हजार 54 मतांनी जिंकले आहेत.
राज्यातल्या जनतेचा महायुतीला स्पष्ट कौल
महाराष्ट्राच्या मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास ठेवत त्यांना सत्ता बहाल केली आहे. मात्र एवढ्यापुरतं हे मर्यादीत नाही. अनेक शक्यता, चर्चा यांना पूर्णविराम देत सर्वसामान्य मतदाराने आपला स्पष्ट कौल नेमका कोणाला हे दाखवून दिलंय. काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत याच मतदारांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मतदान करत महायुतीला योग्य तो इशारा दिला खरा. मात्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला.
महायुतीच्या विजयातही देदीप्यमान कामगिरी केलीय ती भाजपने. भाजपची राज्यातली आजवरची ही सर्वोत्तम कामगिरी. दुसरीकडे महाविकास आघाडीचा पराभव हा दारूण म्हणता येईल असाच आहे. काँग्रेसने 20 चा आकडा पार केला असला तरी ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मतदारांनी सपशेल नाकारल्याचं दिसतंय. राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीलाही जनतेनं सपशेल नाकारलं.