Malshiras: कार्यकर्ता लढला भल्याभल्यांना नडला, मात्र जवळच्यानेच घात केला; राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर गंभीर आरोप
Maharashtra Assembly Election Result Solapur : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांच्यावर भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी गंभीर आरोप केले आहे.
Maharashtra Assembly Election Result Solapur : माळशिरस विधानसभेत (Malshiras Assembly constituency) आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली.भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले ,संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदिने भाजपविरोधात काम केल. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी. असा घणाघाती आरोप करत राम सातपुते (Ram Satpute) यांनी विधान परिषदेचे आमदार रणजित मोहिते (Ranjitsinh Mohite Patil) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी ट्विट करत हे आरोप केले आहे.
रणजितसिंह मोहिते पाटलांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी- राम सातपुते
सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचा आणि माजी पालकमंत्र्यांचा मतदारसंघ राहिलेल्या माळशिरस मतदारसंघात यंदा भाजप महायुती विरुद्ध राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत रंगली होती. मात्र यात राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर (Uttam jankar) यांनी टफ फाईट देत हे मैदान मारलं तर भाजपचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पराभवाला समोर जावे लागले आहे. मात्र या पराभवाचे कारण पुढे करत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांच्यावर भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी गंभीर आरोप केले आहे.
माळशिरस विधानसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आपला पराभव मान्य केला मात्र यावेळेस त्यांनी पराभवाची खापर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर फोडण्याचे दिसून आले. राम सातपुते यांनी रणजीत सिंह मोहिते पाटील यांचे युद्धात फेसबुक पोस्ट लिहिली असून त्यांनी भाजप विरोधात काम केलं, पैसे वाटले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या अशा पद्धतीचे आरोप राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर केले आहे. याशिवाय त्यांची भाजपमधून हकालपट्टी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. विधानसभेत विद्यमान आमदार असलेल्या राम सातपुते यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तम जानकर यांनी पराभव केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या