एक्स्प्लोर

Ajit Pawar : लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, इतका अंडरकरंट होता की विरोधक आडवे पडले, आता आर्थिक शिस्त लावावी लागेल : अजित पवार

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, असं अजित पवार म्हणाले. यामुळं विरोधक आडवे झाले, असं अजित पवार म्हणाले.

मुंबई : महायुतीला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळालं आहे. भाजप 133, शिवसेना 55 , अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 40 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 18,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 11 जागांवर आघाडीवर आहे. अजित पवार यांनी माध्यमांना संबोधित केलं. सर्वजण आपापले अंदाज व्यक्त करत होते. काल वेगवेगळ्या चॅनेलला पाहत होतो. बाकीच्यांचं गाड्या फिरवणं, इकडं जाणं तिकडं जाणं सुरु होतं.  आम्ही पहिल्यांदा पावणे दोनशेच्या पुढं जाऊ असं वाटत होतं. मात्र, कालचं सर्व पाहिल्यावर आम्ही खाली जातो की काय असं वाटत होतं. परंतु, महाराष्ट्रातील जनतेनं विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं यश मिळवून दिलं आहे. त्याबद्दल महायुतीच्या वतीनं जनतेचं आभार मानतो, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी या विजयाचं श्रेय माझी लाडकी बहीण योजनेला दिलं.

लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली : अजित पवार

कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले, घटकपक्षांचे सहकारी राबले. सर्वजण आपली निवडणूक आहे असं समजून कामाला लागले. आमच्या योजनांबाबत टीका टिप्पणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपयश आलं. महाराष्ट्रात अपयश आलं होतं, ते अपयश आम्ही मान्य केलं. त्याच्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करताना अनेक योजना मांडल्या, त्या लोकप्रिय झाल्या. लाडकी बहीण योजना गेमचेंजर झाली. अंडरकरंट असा बहिणींनी दाखवला की सगळे उताणे पडले, आडवे पडले, हे माझं स्पष्ट मत आहे. 

आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. एवढ्या प्रचंड बहुमतानं सरकार आलं आहे. मी राजकारणात आल्यापासून 222 आणि तसं 225 महायुतीला जागा मिळाल्या. एवढं कधी पाहिलं नाही. या यशानं हुरळून देखील जाणार नाही. जसे जसे आकडे पाहत होतो, तेव्हा आर्थिक गोष्टी समोर येत होत्या. आर्थिक शिस्त समोर आणू, आम्हाला याचा अनुभव आहे. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहे. त्याचा आधार आहे, असं अजित पवार म्हणाले. 

विरोधक निवडणूक टीका करतात बॅलट पेपरनं निवडणूक घ्यायला पाहिजे होती मग लोकसभा निवडणूक देखील बॅलट पेपरवर घ्यायला हवी होती. झारखंड आमच्या हातून गेलं, आम्ही काय म्हणतोय का? असा सवाल अजित पवार यांनी केला. 

महाराष्ट्रातील सर्व विभागातून आम्हाला मतदान झालं आहे. लोकसभेला मराठवाड्यात केवळ एक जागा मिळाली होती, असं शरद पवार म्हणाले. आमच्या महायुतीवरील जबाबदारी वाढलेली आहे. जनतेचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. पाच वर्ष एकोप्यानं काम करेल. अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे, असं अजित पवार म्हणाले. 

इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दीRajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं  चित्र कोण रंगवतयं?Rajkiya Shole Suresh Dhus : धसांचा तोफखाना सुरुच, बीडच्या राजकारणाला मराठा-ओबीसी असा रंग?Special Report on Nitesh Rane : केरळला पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
ISRO : नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास,  स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार
नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं श्रीहरीकोटा येथून यशस्वी लाँचिंग
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
Astrology : यंदाची सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
Embed widget