एक्स्प्लोर

लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि आता व्होट जिहाद; जाणून घ्या, निवडणुकीपूर्वी 'या' मुद्द्यावर जोरदार चर्चा का होतेय?

What Is Vote Jihad? आता इंडिया आघाडीनं मुस्लिमांना मत जिहाद करण्यास सांगितलं आहे. आपण सर्वांनी पूर्वी लव्ह जिहाद ऐकलं होतं, लँड जिहाद ऐकलं होतं आणि आता व्होट जिहाद हा शब्द चर्चेत आला आहे.

What Is Vote Jihad? 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात दलीत, मराठा आणि मुस्लिम समाजानं महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aaghadi) मतांचा पाऊस पाडला. यामुळे भाजपला (BJP) मात्र मोठा फटका बसला. लोकसभेत बसलेल्या या फटक्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं (Shiv Sena Shinde Group) विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) लँड जिहाद (Land Jihad) आणि वोट जिहादचा (Vote Jihad) मुद्दा उचलून धरला आहे. आता निवडणुकांच्या धामधुमीत सातत्यानं महायुतीकडून (Mahayuti) केल्या जाणाऱ्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का? खरंच मुंबईत लँड आणि वोट जिहाद सारखी प्रकरण होत आहेत का? की हे फक्त आरोपच आहेत... जाणून घेऊयात सविस्तर... 

आता इंडिया आघाडीनं मुस्लिमांना मत जिहाद करण्यास सांगितलं आहे. आपण सर्वांनी पूर्वी लव्ह जिहाद ऐकलं होतं, लँड जिहाद ऐकलं होतं आणि आता व्होट जिहाद हा शब्द चर्चेत आला आहे. यामध्ये धार्मिक नेते ध्रुवीकरण करून मतं मागतील, त्यालाच व्होट जिहाद म्हणतात, असं एकंदरीत बोललं जात आहे. निवडणुकाजवळ आल्या की, एखादा विशिष्ट समुदाय आपल्या समाजातील लोकांसोबत बैठक घेतो आणि त्या बैठकीत कुणाला मतदान करायचं ते ठरवतात. आश्चर्याची बाब म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत एखादा विशिष्ट समुदाय उघडपणे धमकावला जातो किंवा एखाद्या समुदायाला भडकावलं जातं किंवा दिशाभूल केली जाते. 

सध्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. देशात गेल्या 10 वर्षांपासून मोदी सरकार आहे, कोणत्याही मुस्लिम समाजातील व्यक्तीला हानी पोहोचली आहे का? तरीसुद्धा भाजपवर सातत्यानं आरोप केले जात आहेत, ते आरोप करण्यात माहीर आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मराठा, दलित आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन महायुतीला मतदान केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की, भाजपचा दारुण पराभव झाला. या पराभवातून धडा घेत भाजपनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लँड जिहाद आणि वोट जिहादचा मुद्दा उपस्थित केला. त्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही भाजपच्या साथीनं विरोधकांवर निशाणा साधत आहे.

महाराष्ट्रातील काही भागांत मुस्लिमांची लोकसंख्या खरोखरच वाढली आहे का? लोकसंख्या वाढीमुळे मतांवर परिणाम होतोय का?  महाराष्ट्रात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चुरस चांगलीच रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 

जाणून घेऊयात... लोकांचं नेमकं म्हणणं काय? 

नुकत्याच खासदारांच्या निवडणुका झाल्या आणि एकूणच महाराष्ट्राची आकडेवारी पाहिली तर एका विशिष्ट समाजाला धमकावल्याचं किंवा भडकावलेलं, दिशाभूल झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. भाजप आल्यास चुकीचं ठरेल, असं त्यांना सांगितलं जातंय. हा हिंदुत्वाचा पक्ष आहे. हे आलं तर तुमचा काही फायदा होणार नाही, त्यामुळे मला त्या लोकांना संदेश द्यायचा आहे की, जर रस्ते विकास होत असेल. शाळांचा विकास झाला, तर तिथे हिंदू मुलं आणि मुस्लिम मुलंही येतील. दोघांनाही एकाच प्रकारचं शिक्षण मिळेल, असं एका व्यक्तीनं म्हटलं आहे. 

भारतातील प्रत्येक नागरिक मतदान करण्यास तयार आहे, पण बाहेरच्या लोकांमुळे मताची फेरफार केली जात आहे. बाहेरून आलेल्या लोकांना मतदानाचा हक्क मिळत आहे. हे कसं शक्य आहे? आम्ही जिहाद हा शब्द वापरत आहोत, कारण तो एका विशिष्ट मुस्लिम धर्माशी जोडला जात आहे. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की, जो पक्ष विकास करत आहे, त्या पक्षाविरुद्ध विशिष्ट धर्म भडकावला जात आहे.

आणखी एकानं बोलताना सांगितलं की, इथे 8 कोटींहून अधिक बांगलादेशी त्यांच्या देशात दाखल झाले आहेत. गांधी परिवार, शरद पवार यांचं सरकार आणि काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं त्यांना मदत केली आहे. त्यांना मतदान करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. आज बांगलादेशात आपल्या हिंदू बांधवांचं काय चाललं आहे? आपलं सरकार तिथे बसून काय करतंय? आपल्या हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहेत. एका बाजूनं देशाला कमकुवत करण्याचं काम केलं जात आहे. देश कमकुवत न होता मजबूत झाला पाहिजे.

हिंदुस्थान वक्फ बोर्डानं 1947 नंतर अशा तरतुदी केल्या आहेत, ज्याचा परिणाम काँग्रेस सरकारच्या काळात दिसून आला. तुम्हाला आठवत असेल की, एकदा काही तहसीलदार इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये झाडे लावण्यासाठी गेले होते आणि त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. इथे तुम्ही झाडे कशी लावता, ही वक्फ बोर्डाची जमीन आहे, असं त्यांना सांगण्यात येत असल्याचे स्पष्टपणं दिसत होतं. आज लँड जिहाद हा एक मोठा मुद्दा आहे, असं एका व्यक्तीनं बोलताना सांगितलं

तुम्ही काही दिवसांपूर्वीच अबू आझमी यांचं भाषण ऐकलं असेल. ते म्हणालेले की, मुकेश अंबानी यांची अँटिलिया बिल्डिंग ही वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे. याचा अर्थ एवढ्या मोठ्या माणसाची इमारत त्यांना ताब्यात घ्यायची आहे. वक्फकडे हजारो-लाखो एकर जमीन आहे. आज लँड जिहादमुळे देशभरात, महाराष्ट्रात, सर्व सरकारी जमिनींवर एकतर बांगलादेशी राहत आहेत किंवा कोणीतरी त्यांना वसवण्याचं काम करत आहे.

लँड जिहादच्या नावाखाली एवढा मोठा धंदा सुरू आहे. भारत हा गुलिस्तान आहे आणि तो गुलिस्तानच राहू द्यायला हवा. माझं एकच आवाहन आहे की हिंदू, मुस्लीम, शीख आणि ख्रिश्चन हे आपसात भाऊ आहेत आणि बंधुतेचा नारा नेहमी जिवंत ठेवा, जसा आपल्या गांधीजींनी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी जिवंत ठेवला होता.

दरम्यान, व्होट जिहादच्या मुद्द्यावरून मुंबईतील लोकांमध्ये फूट पडली आहे. त्यांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. महायुती आणि भाजपच्या समर्थकांनी लँड आणि व्होट जिहादच्या मुद्द्यावर आपापल्या नेत्यांचं समर्थन केलंय तर मविआच्या समर्थकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एकंदरीत पाहता, या प्रकरणाबाबत राज्यातील जनतेच्या प्रतिक्रियाही संमिश्र आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget