एक्स्प्लोर

Vadgaon Sheri Assembly Election 2024: सुनील टिंगरेंना पोर्शे प्रकरणाची धडक; बापूसाहेब पठारेंनी मारली बाजी, शरद पवारांना नोटीस पाठवणं पडलं महागात?

Vadgaon Sheri Assembly Election 2024: पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे अपघातानंतर सुनील टिंगरे यांच्यावर काही आरोप लागले होते, त्याचा फटका या विधानसभा निवडणुकीमध्ये बसल्याच्या चर्चा आहेत.

Vadgaon Sheri Assembly Election 2024:  पुण्यातील वडगाव शेरी (Vadgaon Sheri Assembly Election 2024) विधानसभा मतदारसंघात निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून महायुतीत मित्रपक्ष असलेल्या आजी-माजी आमदारांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा लागली होती. वडगाव शेरी मतदारसंघ (Vadgaon Sheri Assembly Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या ताब्यात होता. अजित पवारांनी पुन्हा एकदा विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना संधी दिली होती. मात्र, कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणी लागलेले आरोप आणि शरद पवारांना नोटीस पाठवणं यावेळी टिंगरेंना भोवलं आहे. वडगाव शेरी मतदार संघात शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी झाले आहेत तर सुनील टिंगरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. बापू पठारे यांनी 4 हजार 122 मतांनी विजयी मिळवला आहे. 

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यासह भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही विधानसभा लढवण्याची तयारी दर्शवली होती. वरिष्ठांनी उमेदवारीसाठी शब्द दिल्याचा दावा या दोन्ही नेत्यांकडून केला जात होता. हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. 

उमेदवारीवेळी मोठा ट्विस्ट

वडगाव शेरी मतदारसंघात (Vadgaon Sheri Assembly Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळाली. मात्र, त्यानंतर नाराज झालेल्या भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांना देखील पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली. मात्र, त्यांना पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि मतदारसंघातील  बंडखोरी किंवा मैत्रीपुर्ण होणारी लढत टळली. त्यानंतर आता हाती आलेल्या निकालानंतर पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे अपघातानंतर सुनील टिंगरे यांच्यावर काही आरोप लागले होते, त्याचा फटका या विधानसभा निवडणुकीमध्ये बसल्याच्या चर्चा आहेत. 

2019 ला मिळालेले मताधिक्य

2019 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) सुनील टिंगरे यांनी जिंकली. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार जगदीश मुळीक यांचा 4956 मतांच्या फरकाने पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील विजय टिंगरे हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Dharashiv FDA Raid News: धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
Embed widget