Election Commission : उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टर अन् बॅगांची तपासणी करणाऱ्या भरारी पथकाचं निवडणूक आयोगाकडून कौतुक
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर आणि बॅगांची तपासणी यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं करण्यात आली होती. ठाकरेंनी त्याचा व्हिडीओ चित्रित केला होता.
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय देरकर निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात दाखल होताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची तपासणी केली होती. उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला होती. भरारी पथकाच्या प्रतिनिधींना काही प्रश्न देखील विचारले होते. या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती. यानंतर आज निवडणूक आयोगानं भरारी पथकातील सदस्यांचं कौतुक केलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे वणी येथे आले असता त्यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगची तपासणी करण्यात आली. या केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सामान्य निरिक्षक सज्जन राजसेकर (आयएएस) यांनी कौतुक केले असून अभिनंदन करून प्रमानपत्र दिले आहे.
या पथकामध्ये भरारी प्रथक प्रमुख नितीन बांगडे, भरारी पथक सहायक अमोल गाठे, पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम डडमल आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव यांच्या समावेश होता. तपासणीदरम्यान निपक्षपातीपणा राखून निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक तत्वांचे पालन केले, पारदर्शकतेच्या तत्त्वांना बळकळी दिली त्यामुळे निवडणूक आयोगाची ही उच्च मानके प्रतिबिंबित झाली असे प्रमाणपत्र दिले.
उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची दुसऱ्यांदा तपासणी
उद्धव ठाकरे यांच्या बॅग आणि हेलिकॉप्टरची तपासणी सलग दुसऱ्या दिवशी करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील औसा या विधानसभा मतदारसंघातील सेनेचे उमदेवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी दाखल झाले होते. औसा येथे पोहोचताच उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टर आणि बॅगांची तपासणी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी आज देखील व्हिडीओ चित्रित करुन तुम्हाला पहिलं गिऱ्हाइक म्हणून मी सापडलो का असा सवाल केला.
याशिवाय उद्धव ठाकरे यांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील सभेसाठी जायचं होतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये प्रचार सभेसाठी येणार असल्यानं काही वेळ उद्धव ठाकरे यांना हेलिकॉप्टर उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली होती.
दरम्यान, निवडणूक आयोगानं भरारी पथकांकडून करण्यात येणाऱ्या वाहन तपासणीच्या संदर्भातील माहिती दिली आहे. वाहनांची तपासणी नियमाला धरुन असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं.
इतर बातम्या :
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले