कंपन्यांचं स्थलांतर झालं, हजारोंच्या नोकऱ्या गेल्या, आता मात्र दुरुस्ती करण्याची वेळ, सोन्याचे दिवस आणण्यासाठी राहुलला संधी द्या : शरद पवार
गेल्या काही वर्षात मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यात अपयश आलं, म्हणूनचं आयटी कंपन्या स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.
Sharad Pawar : हिंजवडी आयटी पार्क आणून आपण हजारो लोकांना रोजगार दिला आहे. शहराचा कायापालट केला आहे. यामुळं कामगार वर्ग वसला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. या सगळ्या जमेच्या बाजू आहेत, मात्र चुकीच्या बाजूंकडे लक्ष केंद्रित करतात. मात्र गेल्या काही वर्षात मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यात अपयश आलं, म्हणूनचं आयटी कंपन्या स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढलं आहे. हजारोंच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळं आता दुरुस्ती करण्याची गरज आहे. सत्तेत बदल हा एकमेव पर्याय असल्याचे शरद पवार म्हणाले.
राहुल कलाटे यांची उमेदवारी सामान्य माणसाला न्याय देणारी आहे. जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देणारी आहे. तुम्ही एकदा राहुलला संधी द्या. आम्ही सोन्याचे दिवस आणल्या शिवाय राहणार नाही असेही शरद पवार म्हणाले. पिंपरी चिंचवड म्हणायचे तुम्ही आमच्यासाठी काय केलं. पण आज चित्र पालटले आहे असेही शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज चिंचवडमध्ये आले होते. यावेळी त्यांना राहुल कलाटे यांना संधी द्यावी असं आवाहन केलं. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत चुरशीची मानली जात आहे. दोन्ही उमेदवार तगडे आहेत. महायुतीकडून देखील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप मैदानात आहेत. माहयुतीनं मोठी ताकद त्यांच्या पाठीमागे उभी केली आहे. त्यामुळं या मतदारसंघात काँटे की टक्कर होत आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तेव्हाच सगळं चित्र सप्ट होणँाप आहे.
राहुल कलाटे विरुद्ध शंकर जगताप यांच्यात लढत
चिंचवड हा एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. पण तो गेल्या काही निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचा (BJP) बालेकिल्ला झाला आहे. या मतदारसंघात भाजपमध्ये गेलेले बहुतांश स्थानिक नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. चिंचवडमध्ये विद्यमान आमदार अश्विनी जगताप आहेत. त्यामुळे ही जागा भाजपाकडेच आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी अश्विनी जगताप आणि त्यांचे दीर शंकर जगताप इच्छुक होते. भाजपने यावेळी शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडेही इच्छुकांनी मोठी गर्दी होती. मातच्र, शरद पवार गटाकडून यावेळी राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामंळं चिंचवड मतदारसंघात मोठी रंगत निर्माण झाली आहे.