एक्स्प्लोर

Shivajinagar Assembly Election 2024 : शिवाजीनगर विधानसभेमध्ये इच्छुकांची गर्दी; भाजपकडून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या नावावर शिक्कामोर्तब

Shivajinagar Assembly Election 2024 : महाविकास आघाडीकडून इच्छुकांची फौज सध्या तयार आहे. तर महायुतीकडून लढण्यास इच्छुक वाढतानाचं चित्र होतं. मात्र पहिल्याच यादीत विद्यमान आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

Shivajinagar Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे, निवडणूक आयोगाची पत्रकार पार पडली, निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे आता जागावाटप, दौरे, पक्षप्रवेश गाठीभेटी यांना वेग आला आहे. राज्यभरात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे आणि 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या अनुषंगाने सर्व पक्षांकडे राहिलेल्या काही दिवसात मोठी तयारी करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीची तयारी सुरू केली आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात या वेळी अटीतटीचा सामना रंगणार असल्याच्या चर्चा आहेत. महाविकास आघाडीकडून इच्छुकांची फौज सध्या तयार आहे. तर महायुतीकडून लढण्यास इच्छुक वाढतानाचं चित्र होतं. मात्र पहिल्याच यादीत विद्यमान आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 

शिवाजीनगर मतदारसंघात कशी आहे परिस्थिती

भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी समोर आली. त्यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघामधून पुन्हा एकदा विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधून माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, मनीष आनंद, दिवंगत आमदार विनायक निम्हण याचे चिरंजीव सनी निम्हण हे चार उमेदवार प्रमुख दावेदार आहेत. भाजपकडून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे, निवेदिता एकबोटे, अॅड. मधुकर मुसळे, संदीप काळे, बाळासाहेब अमराळे इच्छुक होते, मात्र, सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जारी करण्यात आली आहे. मनसेकडून रणजित शिरोळे देखील तयारी सुरू केली आहे.

लोकसभेला शिवाजीनगरमधून सर्वात कमी मताधिक्य

शिवाजीनगर मतदारसंघ दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही ‘शिवाजीनगर’मधून भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नव्हते. त्यामुळे हा मतदार संघ हातातून जाऊ नये, यासाठी आता भाजपची धडपड सुरू झाली आहे, विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे हे देखील गेल्या काही दिवसांपासून ‘सक्रिय’ झाले आहेत. भाजपचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा शिवाजीनगर मतदारसंघ पक्षाच्याच हातातून कसा निसटत चाललाय? अशा चर्चा आहेत. मात्र, पुन्हा एकदा सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिल्याने पुन्हा एकदा ताकदीने मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजप तयारी करत आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीनंतर काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी बाजी मारुन विजय मिळविला. हे दोघेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरले होते. अखेरच्या फेरीत सिद्धार्थ शिरोळे यांनी 5124 मते मिळवून विजय खेचून आणला.

2019 ला मिळालेले मताधिक्य

आमदार सिद्धार्थ शिरोळे - 58580 
दत्ता बहिरट- 53440

भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे यांना 58727 मते मिळाली तर, काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांना 53603 मते मिळाली. सिद्धार्थ शिरोळे यांचा 5124 मतांनी विजय झाला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : अर्ज नेत्यांचा, त्रास जनतेला; शक्तिप्रदर्शनामुळे वाहतूक कोंडीDevendra Fadnavis Nagpur : उद्यापर्यंत भाजपची दुसरी यादी जाहीर करणार : देवेंद्र फडणवीसRajkiya Sholay : दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीची खलबतं, बैठकीची इनसाईड स्टोरीZero Hour : लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार मुख्यमंत्र्यांची शाहांसमोर अधिक जागांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
Raju Shetti : सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
Embed widget