Kothrud Assembly Election : कोथरूडमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागणार? पुन्हा चंद्रकांत पाटील पाडणार आपली छाप? किशोर शिंदेंचंही आव्हान
Kothrud Assembly Election : ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यातील लढत रंगत होण्याची शक्यता आहे आणि भाजपच्या अंतर्गत बंडखोरी झाली तर मग चुरस वाढणार आहे. तर मनसेने किशोर शिंदेंना उमेदवारी जाहीर केल्यामुळे मतांचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Kothrud Assembly Election : पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. 2019 चंद्रकांत पाटील या मतदार संघातून निवडून आले होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे गटाच्या माजी आमदार असलेल्या चंद्रकांत मोकाटे यांचं आव्हान असणार आहे. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांना पक्षांतर्गत विरोधाचा देखील मोठ्या प्रमाणात सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भाजपचे बालेवाडीचे नगरसेवक अमोल बालवडकर हे पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचा सपाटा लावला होता. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारीच्या यादीत चंद्रकांत पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
पुण्यातील भाजपच्या काही नेत्यांचा त्यांना छुपा पाठिंबा आहे का?, असा प्रश्न विचारला जातोय. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना 75 हजारांचे मताधिक्य मिळालं होतं. हा मतदार संघ जेव्हापासून अस्तित्वात आला आहे, तेव्हापासून तो भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेना आणि भाजपची युती असताना शिवसेनेचा आमदार निवडून येत होता. मात्र, युती तुटल्यानंतर भाजपकडून 2019 मतदारसंघातून निवडून आले.
त्यामुळे आता आधी निवडून आलेले ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यातील लढत रंगत होण्याची शक्यता आहे आणि भाजपच्या अंतर्गत बंडखोरी झाली तर मग चुरस वाढणार आहे. बऱ्यापैकी शहरी मतदारसंघ आहे. मागील काही काळात मतदार संघातील मतदारांची संख्या सातत्याने वाढत आहे बाहेरुन येऊन इथे स्थायिक होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोथरुडमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत, त्यावर तोडगा आणि महत्वाचं म्हणजे वाहतूक कोंडीवर तोडगा काढणारा आमदार असावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
कोथरुड मतदारसंघात कशी आहे परिस्थिती
शिवसेनेचा या मतदारसंघावर दावा असल्याने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काँग्रेसकडून माजी नगरसेवक रामचंद्र कदम, राष्ट्रवादीकडून शंकर केमसे, दीपक मानकर, मनसेकडून अॅड. किशोर शिंदे, तर आपकडून डॉ. अभिजित मोरे इच्छुक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात तुल्यबळ नेता नसल्याने पुन्हा एकदा चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मनसे सहभागी झाली होती. त्यावेळी जागावाटपात हा मतदारसंघ मनसेला सोडला होता. परंतु मनसेला विजय मिळवता आला नाही.
2019 ला मिळालेले मताधिक्य
चंद्रकांत पाटील - 105246
किशोर शिंदे- 79751