एक्स्प्लोर

मोदी-शाह यांच्या आशिर्वादानेच राज्यात पैसे वाटपाचा प्रकार, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल, म्हणाले तावडेंना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न

Prithviraj Chavan on Vinod Tawde : राज्यात पैसे वाटपाचा प्रकार मोदी- शाह यांच्या आशीर्वादानेच सुरु असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Prithviraj Chavan  : भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात पैसे वाटपाचा प्रकार मोदी- शाह यांच्या आशीर्वादानेच सुरु असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. विधानसभेतील पराभवाचे खापर फोडण्यासाठी भाजपच्याच मोठ्या नेत्याने विनोद तावडेंबाबत माहिती दिल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे. तर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपल्याला फोन करुन शुभेच्छा दिल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

निवडणुकीनंतर भाजपाचा पराभव झाल्यास विनोद तावडेंवर पराभवाचे खापर फोडले जाणार

राज्यभर निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून वारेमाप पैसा वापरला जात आहे. कराड दक्षिणेत दोन दिवसापूर्वी पैसै वाटताना एकाला पकडले आहे. सत्ता अबाधित ठेवण्यासाठी मोदी - शाहा यांच्या आशीर्वादने हा प्रकार सुरु असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. निवडणुकीनंतर भाजपाचा पराभव झाल्यास विनोद तावडेंवर पराभवाचे खापर फोडले जाईल आणि चुकून भाजपाचा विजय झाला तर विनोद तावडेंना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न चालला असून भाजपाचा अंतर्गत प्रश्न 
असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप

विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या आरोपाचं प्रकरण सुरु होते. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही आरोप केला होता. विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलला शेकडो कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. त्यामुळे बराच काळ गदारोळ झाला. त्यानंतर पोलिसांनी विनोद तावडे यांना सुरक्षित बाहेर काढले आहे. हॉटेलमध्ये 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. याप्रकरणावरुन विरोधकांकडून विनोद तावडे आणि भाजपवर जोरदार टीका होताना दिसत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मला शुभेच्छा दिल्या

मनोज जरांगेनी मला शुभेच्छा दिल्या असून मला श्रेयवादात, राजकारणात पडायचे नाही. आज दुपारी 3.30 वाजता मनोज जरांगे यांचा फोन आला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. कराड दक्षिण (Karad South Assembly Seat ) हा सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. कारण, या मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan ) आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघातून ते तिसऱ्यांना निवडणूक लढवत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर, दुसरीकडे महायुतीकडून भाजपचे अतुल भोसले (Atul Bhosale) हे निवडणूक लढवत आहेत. अत्यंत चुरशीची ही लढत होण्याची शक्ययता आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Vinod Tawde VIDEO : मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याने तावडे अडचणीत आले का? विनोद तावडे म्हणाले, माझंही ठरलंय...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणाEknath Shinde Majha Vision| खुर्चीसाठी भानगड नाहीच, तिघांची गाडी एकच,सत्ताधारी विरोधक रथाची दोन चाकं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget