एक्स्प्लोर

भाजपच्या स्नेहा पाटील बंडखोरी करत विधानसभेच्या रिंगणात, एमएमआरडीएचं पथक पाटील यांच्या गोदामांवर कारवाईसाठी पोहोचलं, ग्रामस्थ एकवटले अन्...

भिवंडी ग्रामीण मधील भाजपच्या बंडखोर उमेदवार स्नेहा पाटील यांच्या गोदामांवर कारवाई करण्यासाठी सायंकाळी उशिरा एमएमआरडीए प्रशासनाचं पथक पोहोचलं होतं.

ठाणे : भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुती शिंदे गटाचे उमेदवार शांताराम मोरे यांच्या विरोधात बंडखोरी केलेल्या भाजपच्या स्नेहा पाटील यांच्या काल्हेर ग्रामपंचायत हद्दीतील गोदामांवर एमएमआरडीए प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी उशिरा कारवाईचा घाट घातला होता.ही कारवाई करत असताना संबंधित अधिकाऱ्याने कोणती ही नोटीस बजावलेली नव्हती असा आरोप स्नेहा पाटील यांनी केला आहे.  मी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानंतर प्रशासनाकडून सूडबुद्धीने ही कारवाई केली जात असून मी एक भूमिपुत्र महिला विधानसभा निवडणुकीत लढत असताना एमएमआरडीए प्रशासनाकडून  होत असलेली कारवाई चुकीची आहे असा आरोप स्नेहा पाटील यांनी केला आहे. 
 
आचारसंहिता सुरू असताना कोणतीही पूर्वकल्पना अथवा नोटीस न बजावता एमएमआरडीए कारवाई करतातच कसे असा प्रश्न स्नेहा पाटील यांनी उपस्थित केला आहे.आमच्या वडिलोपार्जित जमिनी वरील ही तीन गोदाम 1999 मध्ये बनवण्यात आलेली असून त्यावेळेस एमएमआरडीए प्रशासनाचे हे कार्यक्षेत्र नव्हते. 2009 मध्ये भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागाचा समावेश एमएमआरडीए क्षेत्रात केल्या नंतर त्यांची परवानगी घेण्यास सुरुवात झाली.असे असताना परवानगी घेऊन बांधलेल्या गोदामां वर ही कारवाई सूडबुद्धीने होत असून तालुक्यात कोणत्याही भूमिपुत्रांच्या  गोदामांवर अशी कारवाई करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला तर तेथे एक भूमिपुत्र महिला म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा इशारा स्नेहा पाटील यांनी दिला आहे.परंतु ही कारवाई सूडबुद्धीने केली जात आहे का असा प्रश्न वारंवार विचारल्यानंतर ही त्यांनी कोणाचेही नाव न घेता या कारवाईचे  खापर फक्त एमएमआरडीए प्रशासनावर फोडले आहे.

एमएमआरडीएची भूमिका 

ही अचानक होणारी कारवाई नसून या संदर्भात एमआरटीपी अंतर्गत नोटीस बजावण्यात आलेली होती.त्यानंतर या अनधिकृत बांधकामावर ही कारवाई होत आहे.एमएमआरडीए अनधिकृत बांधकामांवर अशा कारवाया करतच असते ,त्यासाठी अशा बांधकामांना नोटीस देऊन ही कारवाई होत  असते.त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करण्यासाठी आलो आहोत, या विभागाचे अधिकारी प्रफुल्ल कांबले यांनी म्हटलं.  
 
दरम्यान, काल्हेर गावातील संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र आले. त्यांनी कारवाईस विरोध केल्यानंतर एमएमआरडीएचे पथक रिकाम्या हाती परतले.
 
इतर बातम्या :
 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget