एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Vidhansabha Election 2024: अलिबाग विधानसभा मतदारसंघात महेंद्र दळवी यांचा विजय

Maharashtra Assembly Election 2024: 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला होता.

Alibaug Vidhansabha Election 2024: अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांचा विजय झाला आहे. महेंद्र दळवी यांनी महाविकास आघाडीच्या चित्रालेख पाटील यांचा पराभव केला. महेंद्र दळवी यांना 1 लाख 13 हजार 599 मते मिळाली. 

2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला होता. अलिबाग हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये शिवसेना (शिंदे गट) महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाच्या सुभाष पाटील यांचा 32924 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली. अलिबाग-मुरुड हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असताना शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी 2019 च्या निवडणुकीत 30 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवल्याने या बालेकिल्ल्यास मोठे भगदाड पाडण्यात महेंद्र दळवी हे यशस्वी ठरले होते. 

अलिबागचा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एक दोन अपवाद सोडले तर या मतदार संघातून सतत शेकापचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात यावा अशी मागणी शेकापने केली आहे. या मतदारसंघातून शेकाप सरचिटणीस जयंत पाटील त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस ऍड प्रवीण ठाकूर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे अलिबाग मुरुड मतदार संघावर काँग्रेसने दावा केल्यामुळे महाविकास आघाडीत सुद्धा पुन्हा नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर शिवसेनेने (ठाकरे) अलिबागमधून जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी दिली जावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेनी या मतदारसंघावरचा हक्क सोडू नये अशी इच्छा स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अलिबाग विधानसभेतून नक्की कोणाला तिकीट मिळणार, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. 

अलिबाग मतदारसंघाचा इतिहास-

अलिबाग-मुरुड मतदारसंघाची 2008 मध्ये पुर्नरचना झाल्यानंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता. तत्पूर्वी अलिबागला उरणचा काही भाग जोडला होता. तर श्रीवर्धनला मुरुड जोडला होता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या मीनाक्षी पाटील यांनी काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांचा पराभव केला होता. पुढे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे सुभाष ऊर्फ पंडित पाटील यांनी शिवसेनेच्या महेंद्र दळवींचा पराभव करून विधानसभेत पाऊल टाकले होते. तर 2019 च्या निवडणुकीत महेंद्र दळवी यांनी पराभवाचा बदला घेत पंडित पाटील यांना पराभूत केले.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव-

विधानसभेत संख्याबळ नसतानाही विधानपरिषद निवडणूक जिंकण्याचा करिष्मा असणारे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणूक यावेळी पराभव झाला. 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शेकपच्या जयंत पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात आला होता. पण जयंत पाटील यांना अपेक्षित मतेच मिळाली नाही. जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची फक्त 8 मते मिळाली. तर जयंत पाटलांच्या एकूण मतांची संख्या फक्त 12 इतकीच राहिली. पराभवानंतर जयंत पाटील संतप्त झाले होते.

संबंधित बातमी:

रायगड जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व, महायुती की महाविकास आघाडी?, संपूर्ण आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Embed widget