एक्स्प्लोर

Indapur Assembly Constituency: इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची प्रतिष्ठा पणाला! मतदारसंघात होणार तिरंगी लढत, हर्षवर्धन पाटील पुन्हा मिळवणार आपला मतदारसंघ?

Indapur Assembly Constituency: दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांच्यात तिरंगी सामना होणार आहे.

इंदापूर: इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यामुळे इंदापूर मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर मतदारसंघातील राजकीय परिस्थिती संपूर्णपणे बदलल्याचं दिसून येत आहे. इंदापूर मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मात्र, अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले प्रवीण माने असा तिरंगी सामना रंगणार आहे. 

इंदापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी असा सामना आहे, ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात जरी ही लढत होत असली तरी देखील अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तेव्हा इंदापुरकर कोणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

मतदारसंघात हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयामुळे राजकीय उलथापालथ

लोकसभेला इच्छुक असलेले हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना विधानसभेला देखील उमेदवारी मिळेल की, नाही याबाबत शंका वर्तवली जात होती. या मतदारसंघात विद्यमान आमदार हे दत्तात्रय भरणे आहेत, अजित पवार सत्तेत गेल्यानंतर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने दावा सांगितला होता. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीबाबतचे अनेक तर्क वितर्क लावले जात होते, त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला, आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशामुळे इंदापूरमध्ये बऱ्याच राजकीय हालचाली झाल्या.

पुणे जिल्हा बँकेचे संचालक आणि हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे नातेवाईक असलेले अप्पासाहेब जगदाळे हे शरद पवार गटात होते. मात्र, त्यांनी अजित पवारांकडे जाणं पसंत केलं आणि त्यांनी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर इंदापुरसह राज्यभरात नाव असलेल्या सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने हे शरद पवारांसोबत होते पण हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळाल्यानंतर ते नाराज झाले. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. इंदापुरचे स्थानिक नेते भरत शहा हे देखील शरद पवारांसोबत होते पण आता ते बाहेर पडले. नंतर शरद पवारांनी इंदापुरातील नाराज स्थानिक नेत्यांच्या भेटी घेतल्या, मात्र त्याचा किती फायदा होणार ते लवकरच दिसेल.

विधानसभा मतदारसंघातील उमेदवार

महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने या तिघांमध्ये तिरंगी लढत होईल हे स्पष्ट झाले आहे.

2019 चा निकाल काय?

1995 ते 2004 पर्यंत इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांचा दबदबा होता. हर्षवर्धन पाटील यांनी सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. इंदापुरातील राजकारणात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. 2009 मध्ये, हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळी त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. या वेळीही त्यांना विजय मिळाला. मात्र, 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांनी विजय मिळवला. 2019 मध्येही दत्तात्रेय भरणे यांनी विजय मिळवला. 114,960 मतांनी बाजी मारली. यावेळी होणारी विधानसभा निवडणूक मोठी चुरशीची ठरणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी कराBag Checking Case Maharashtra | हेलिकॉप्टरची तपासणी कोण करतात? एफएमटी पथक म्हणजे नेमकं?Laxman Hake on Sharad Pawar NCP : तुतारीचे भलेभले उमेदवार आडवे केल्याशिवाय ओबीसी राहणार नाहीEknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Embed widget