IANS- MATRIZE Survey: विदर्भात कोण वरचढ ठरणार? विधानसभेत मतदारांचा कौल कुणाला? ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारानं जोर धरला असून याच दरम्यान IANS- MATRIZE चा एक सर्व्हे समोर आला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 288 जागांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. त्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीकडून राज्यभरात जोरदार प्रचार सुरु आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांकडून राज्यातील विविध भागात सभा आणि रॅलीमधून प्रचार सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना IANS- MATRIZE च्या सर्व्हेची आकडेवारी समोर आलेली आहे.
यामध्ये विदर्भात 62 जागांपैकी महायुतीला 32 ते 37 जागा मिळतील, असा अंदाज IANS-Matrize च्या सर्व्हेने व्यक्त केलाय. तर महाविकास आघाडीला 21 ते 26 जागा मिळतील, असं सर्व्हेतून समोर आलं आहे. याशिवाय विदर्भातील टक्केवारीचा विचार केला तर महायुतीला 48 टक्के मतं मिळू शकतात. तर महाविकास आघाडी 39 टक्के मतं खेचून आणू शकते, अशी चिन्हं दिसत आहेत.
विदर्भात कोण वरचढ ठरणार? IANS-Matrize Survey
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला महाराष्ट्रात आणि विशेषत: विदर्भात मोठे यश मिळेल होते. मात्र, IANS- MATRIZE सर्व्हेच्या निष्कर्षानुसार यंदा राज्यात महायुतीची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असूनही सत्तेपासून वंचित राहावे लागेल, अशी चिन्हं दिसत आहेत. तर विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत. त्यापैकी महायुतीला 32 ते 37 जागा मिळतील, असा अंदाज IANS-Matrize च्या सर्व्हेने व्यक्त केलाय. तर महाविकास आघाडीला 21 ते 26 जागेवर समाधान मानावे लागणार आहे.
विदर्भातील राजकीय गणित काय?
विदर्भाचे राजकीय गणित बघता यंदा विदर्भात 5 मतदारसंघात दोन्ही शिवसेना समोरासमोर आहेत. तर मराठवाड्यात 10, पश्चिम महाराष्ट्रात 8, मुंबईत 10, उत्तर महाराष्ट्रात 4 आणि कोकणात 9 मतदारसंघात दोन्ही शिवसेना समोरासमोर आहेत. तर राज्यातील तब्बल 75 मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे. त्यातही विदर्भात सर्वाधिक 35 भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. या थेट लढतीमुळे फक्त राज्यातील सत्तेत कोण बसेल याचा निर्णयच होणार नाही, तर राज्यात भाजप सरस आहे की महाराष्ट्र काँग्रेसचे गड आहे, खरी शिवसेना शिंदेंची आहे की ठाकरेंची आणि ओरिजनल राष्ट्रवादी दादांची असणार की राष्ट्रवादी शरद पवारांची याचा निर्णय ही करणार आहे. त्यामुळे या थेट लढती निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत आणि मतदारांसाठी लक्षवेधी ठरत आहे.
ओपिनियन पोलची आकडेवारीचा काय अंदाज?
IANS- MATRIZE Surveyच्या आकडेवारीनुसार, विधानसभा निवडणुकीत महायुतीला 145 ते 165 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून 106 ते 126 जागा मिळू शकतात. लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. मात्र, ओपिनियन पोलनुसार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुती विदर्भात कमबॅक करताना दिसत आहे. विदर्भात महायुतीला 48 टक्के मतांसह 32 ते 37 जागांवर विजय मिळेल. तर महाविकास आघाडीला 21 ते 26 जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलसाठी 10 ऑक्टोबर ते 9 सप्टेंबर या काळात सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात 1,09,628 लोकांशी बोलून त्यांची मतं नोंदवण्यात आली. यामध्ये 57 हजार पुरुष, 28 हजार महिला आणि 24 हजार तरुणांचा समावेश होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या