Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Dates LIVE : मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्हाला बंदी नाही, निवडणूक आयोगाची माहिती
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Announcment Live : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
LIVE

Background
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्हाला बंदी नाही, निवडणूक आयोगाची माहिती
राजीव कुमार, केंद्रीय निवडणूक आयुक्त
आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मागणी करण्यात आली होती
तुतारी वाजवणारा माणूस लहान आणि अस्पष्ट दिसतो तर त्याचा आकार वाढवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती
तर आम्ही ती मागणी मान्य केली आहे
तुतारी वाजवणारा माणूस स्पष्टपणे मोठा दिसेल
पिपाणीला बंदी नाही
Jharkhand Vidhan Sabha Election 2024 Schedule : झारखंडमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होणार
झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
पहिला टप्पा -43 जागंवर मतदान
नोटिफिकेशन 18 ऑक्टोबर
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 25 ऑक्टोबर
अर्जांची छाननी 28 ऑक्टोबर
अर्ज मागं घेण्याची तारीख 30 ऑक्टोबर
पहिला टप्पा मतदान -13 नोव्हेंबर
दुसरा टप्पा- 38 जागांवर निवडणूक
निवडणुकीचं नोटिफिकेशन: 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान :20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024
निवडणूक प्रक्रिया समाप्त: 25 नोव्हेंबर 2024
Maharashtra Assembly Election 2024 Schedule : राज्यात मतदान कधी होणार, मतमोजणी नेमकी कधी?
निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी राज्यात मतमोजणी होईल. म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. उमेदवारांना 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. उमेदवारांना 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणा आहेत.
Election Commission Press Conference LIVE : 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या घरुनच मतदान करता येणार- मुख्य निवडणूक आयुक्त
85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना त्यांच्या घरीच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. व्होटर हेल्पलाईन अॅपमध्ये त्यांचे मतदान नेमके कुठे आहे, ते पाहू शकतात. -राजीव कुमार
Election Commission Press Conference LIVE : झारखंडमध्ये एकूण 81 जागांवर मतदान होणार- राजीव कुमार
झारखंडचा विचार करायचा झाल्यास या राज्यात 24 जिल्हे आहेत. यात एकूण 81 जागांवर विधानसभा निवडणूक होणार आहे. यातील 28 जागा या एसटी प्रवर्ग आणि 9 जागा या एससी प्रवर्गासाठी राखीव असतील. झारखंड विधानसभेचा कार्यकाल 5 जानेवारी रोजी संपणार आहे. या राज्यात 2.6 कोटी मतदार आहेत. यात 1.29 कोटी महिला तर 1.31 कोटी पुरुष मतदार आहेत.- राजीव कुमार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
