उध्दव ठाकरेंची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची मशाल (Mashal) क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली.
CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची मशाल (Mashal) क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. धनुष्यबाण आमचा आहे, म्हणणाऱ्यांनी मशालही देऊन टाकल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. परंडा येथील जनतेच्या मनात काय आहे, हे गर्दीने ठरवलं आहे. 23 तारखेला एकनाथ शिंदे फटाखे फोडायला येतोय असेही मुख्यमंत्री म्हणाले. परांडा विधानसभेचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी आयोजीत करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
ही तानाजी सावंत यांच्या विजयाची सभा
भर उन्हात थांबलेल्या सर्वांना वंदन करतो, तानाजीराव तुमच्या प्रेमापोटी हे लोक आले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. ही तानाजी सावंत यांच्या विजयाची सभा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तानाजी सावंत यांनी किल्ल्याची राखण हाती घेतली आहे, त्याला खूप दिवस झाले. त्यांचा नाद करायचा नाही. तानाजीराव जादूगार आहेत. ते जादू करतात असेही मुख्यमंत्री म्हणाले. परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव ठाकरेंनी रणजित पाटील यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र तो मागे घेत शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांची उमेदवारी फायनल झाली आहे. यावरुन देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली
बाळासाहेबांनी कमावलेला धनुष्यबाण त्यांनी विकून टाकला असता. आम्ही शिवसेना वाचवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बाळासाहेब यांचे विचार विकायला निघाल्यावर आम्ही उठाव करण्याचं धाडस केलं, तानाजीराव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. गिनिज बुकमध्ये नोंद झाली असं काम तुमच्या पठ्ठ्या ने केलंय, असे म्हणत पुन्हा एकदा शिवसेनेच्या बंडात तानाजी सावंत यांची भूमिका महत्त्वाची होती, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी आणि महायुतीने केलेली काम बघा, होऊन जाऊद्या दूध का दूध पाणी का पाणी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
परांडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राहुल मोटे मैदानात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात महायुतीचे तानाजी सावंत हे निवडणूक लढवत आहेत. या दोघांमध्ये काँटे की टक्कर आहे.
महत्वाच्या बातम्या: