Chembur Vidhan Sabha constituency: ठाकरेंच्या बलाढ्य किल्ल्यातून शिंदेंच्या तुकाराम कातेंचा विजय, चेंबूर मतदारसंघातील जनतेचा कौल समोर
Chembur Vidhan Sabha constituency: चेंबूर विधानसभा मतदारसंघात तुकाराम काते यांचा विजय झाला आहे.
मुंबई: मुंबई उपनगर जिल्ह्यातील चेंबूर हा विधानसभा मतदारसंघ (Chembur Vidhan Sabha constituency) शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. प्रकाश फातर्फेकर हे शिवसेनेला सलग तिसऱ्यांदा ही जागा जिंकणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. पण याच मतदारसंघातून शिंदेंसोबत गेलेल्या तुकाराम कातेंनी (Mangesh Kudalkar) विजय मिळवला आहे. फातर्फेकर हे ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्याने त्यांना याच मतदारसंघातून उमेदावीरी देण्यात आली होती. पण एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या तुकाराम कातेंनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये शिवसेनेच्य प्रकाश फातर्फेकर यांना 53264 मतं पडली होती, जी एकूण मतदानाच्या 40.15 टक्के इतकी होती. तर काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. या मतदारसंघात सुरू असलेली विविध विकसकामं, बडेबडे पुनर्विकास प्रकल्प, त्यांतील समस्या हा इथं प्रचाराचा मुद्दा ठरल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची ही भक्कम आघाडी फोडून काढण्यासाठी महायुतीला इथं एखादा तगडा उमेदवार देणं गरजेचं होतं.
आणखी वाचा