BJP Kasaba Peth Crisis : कसबा पेठेत भाजपची हेमंत रासनेंना उमेदवारी, धीरज घाटे अन् कुणाल टिळकांची नाराजी,नेमकं काय घडलं?
Pune BJP : भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. या यादीत कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे : भाजपकडून आज विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पुण्यातील तीन मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. यामध्ये कसबा पेठ मतदारसंघाचा देखील समावेश आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अनेक इच्छुकांची रांग लागली होती. यात शहराध्यक्ष धीरज घाटे, कुणाल टिळक आणि हेमंत रासने यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. धीरज घाटे यांना उमेदवारी मिळेल असं बोललं जात होतं. कसब्यात ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, धीरज घाटे यांच्या नावाची चर्चा असताना हेमंत रासने यांची कसबा विधानसभा मतदारसंघाचा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर धीरज घाटे आणि कुणाल टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय....
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी फेसबुक आणि एक्स वर पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केलीय. तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवयं, पण 30 वर्षं हिंदुत्वासाठी कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय.. असं घाटे यांनी या पोस्टमधे म्हटलंय . धीरज घाटे हे कसबा पेठ मतदारसंघातुन निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र भाजपने पुन्हा एकदा हेमंत रासने यांनाच उमेदवारी दिली आहे..
यापूर्वी चार वेळा मी प्रक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांनी यावेळीही मला उमेदवार दिली नाही. त्यामुळे मी फेसबुक पोस्ट केली आहे आणि त्यातून नाराजी व्यक्त केल्याचं धीरज घाटे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
एका महत्त्वाच्या कोणत्याच व्यक्तीवर माझी नाराजी नाही तर पक्ष श्रेष्ठींवर नाराजी आहे. त्यांना हेमंत रासने हे योग्य उमेदवार वाटले असतील पण माझी या मतदारसंघात जास्त चर्चा होती असंही घाटेंनी म्हटलंय.
वरिष्ठ नेत्यांना जाब विचारणार: कुणाल टिळक
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर माजी आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी दुःख व्यक्त केलीय. आईने पक्षनिष्ठेचं उदाहरण सगळ्या महाराष्ट्राला दिलं तेच पार्टी आता विसरली की काय? आणि टिळकांनाही विसरली काय असा प्रश्न पडतो, असं कुणाल टिळक म्हणाले.
जरी उमेदवारी नाकारण्यात आली असली तरी पक्षाशी एकनिष्ठ राहील. मात्र, माझ्या वरिष्ठ नेत्यांना जाब विचारणार की आम्ही कुठे चुकलो? पिंपरी चिंचवड जगतापांच्या कुटुंबाला एक न्याय आणि टिळकांच्या कुटुंबाला वेगळा न्याय असं का? असा सवाल कुणाल टिळक यांनी केला.
गेले दीड वर्ष संपूर्ण कसबा विधानसभा मतदारसंघात लोकांची काम केली आणि यावेळेस संधी मिळाली असती तर नक्कीच विजय झाला असता, असं कुणाल टिळक म्हणाले.
इतर बातम्या :