एक्स्प्लोर

Bala Nar : महिलांच्या पदराआड लपून लढण्यापेक्षा समोर या, बाळा नर यांचे जोगेश्वरीतील राड्यानंतर रवींद्र वायकर यांना आव्हान

Bala Nar : जोगेश्वरी पूर्वमध्ये काल झालेल्या राड्यानंतर रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केले. त्याला अनंत (बाळा) नर यांनी उत्तर दिलं.

मुंबई : काल जोगेश्वरीतील मातोश्री संकुलाबाहेर झालेल्या राडा प्रकरणी आज शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्या महिला कार्यकर्त्यांचे कपडे फाडून त्यांना नखे मारून त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप केला. मात्र यावर आता प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्व मतदार संघाचे उमेदवार अनंत उर्फ बाळा नर यांनी वायकर यांचे सर्व आरोप खोडून काढले. शिवाय महिलांच्या पदराआड लपून लढण्यापेक्षा समोरासमोर येऊन लढा, असे आव्हान देखील नर यांनी वायकर यांना दिले आहे.

 ज्या आदित्य ठाकरे यांना तुम्ही बालिश म्हणता त्यांच्या मातोश्रीमुळेच अंधेरीतील तुमची मातोश्री उभी राहिली आहे. जोगेश्वरी अंधेरीतील प्रत्येक शिवसैनिकाचे यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिश्रम आहेत. माझ्या सुनेबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून यावर मी आता काही बोलणार नाही असेही नर यावेळी म्हणाले. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारंसघातून उद्धव ठाकरे यांनी बाळा नर यांना उमेदवारी दिली आहे. 

सर्वसामान्य लोकांमध्ये 35 वर्ष काम केलं आहे. पाचशे पाचशे महिला आमच्या कार्यक्रमाला येतात. महिलांच्या पदराआड लपण्यापेक्षा समोर या, असं आव्हान बाळा नर यांनी दिले. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असं बाळा नर रवींद्र वायकर यांना म्हणाले. शिवसेनेनं मला दोनदा तिकिट दिलं, माझ्या मेहनतीमुळं दिला, असं बाळा नर म्हणाले. 

रवींद्र वायकर यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर आणि  उमेदवार अनंत उर्फ बाळा नर यांच्या विरोधात आरोप केले होते. ठाकरे गटानं पोलिसात तक्रार करणं आवश्यक होतं, असं वायकर यांनी म्हटलं.  रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या जोगेश्वरी पूर्व मतदार संघाच्या शिवसेना महायुतीच्या उमेदवार आहेत. याच मतदार संघात मागील काही दिवसांपासून अनंत नर यांची गुंडगिरी सुरू असून मतदारांना धमकावले जात आहे असा आरोप वायकर यांनी केला. ते पुढे म्हणाले की मंगळवारी रात्री अनंत नर याने दीडशे दोनशे कार्यकर्ते घेऊन आले आणि शिवीगाळ केली. 

 जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात काल रात्री राडा झाला होता.रवींद्र वायकरांचे कार्यकर्ते  महिलांना वस्तूंचं वाटप करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला होता. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्री क्लब इथे गेल्यानंतर वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा दावा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता.

 यातून वाद वाढल्याने, पोलिसांनी या मध्ये हस्तक्षेप करावा अशी शिवसेना ठाकरे गटाची मागणी होती. यातून दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या  कार्यकर्त्यांनी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड अडवत वायकरांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली होती.  त्यानंतर कार्यकर्त्यांवर एकमेकांकडून काही प्रमाणात दगडफेक करण्यात आल्याचेही समोर आला होता. 

इतर बातम्या :

 देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्रीपदाला विरोध का? एकवेळ भाजपला मतदान करु, पण तुतारीला नाही: लक्ष्मण हाके

तुमच्याकडे पैसे असतील तर हिशोब द्या, बिनशर्ट किंवा इनशर्ट...; किशोरी पेडणेकरांनी राज ठाकरेंना सुनावलं!

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका

Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Embed widget