Akole Assembly Constituency : विधानसभेची खडाजंगी : घड्याळ विरुद्ध तुतारीचा सामना रंगणार; कोण मारणार बाजी
Akole Assembly constituency 2024 : अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदार संघ म्हणजे अकोले विधानसभा मतदार संघ.
Maharashtra Assembly Election 2024 : अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदार संघ म्हणजे अकोले विधानसभा मतदार संघ. आदिवासी समाज जास्त असलेल्या अकोले विधानसभेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आहे. किरण लहामटे हे तिथले विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार गटाकडे जाणार असून घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना रंगणार आहे. परंतु शरद पवार यांच्याकडून कोण मैदानात उतरणार याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे.
अकोले विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पिचड यांनी एकहाती सत्ता गाजवली. १९८० ते २०१४ असे सलग सात वेळा ते आमदार होते. २०१४ मध्ये त्यांचे पुत्र वैभव पिचड हे सुद्धा विधानसभेच्या रिंगणात उतरले अन् विजयी झाले. मात्र २०१९ च्या निवडणुकीत पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची सत्ता गेली आणि याठिकाणी राष्ट्रवादीचे किरण लहामटे हे निवडून आले. आता किरण लहामटेंना शह देण्यासाठी शरद पवार कोणाला उमेदवारी देणार हे अद्याप ठरलेलं नाही.
यंदा अकोलेतून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांचं नाव जवळपास आघाडीवर आहे. महत्वाचे म्हणजे सध्या भाजपमध्ये असलेले वैभव पिचडही तुतारी हाती घेऊन विधानसभेच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. मात्र अद्याप त्यांचा पक्षप्रवेश झाला नसल्याने सस्पेन्स कायम आहे.
२०१९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे उमेदवार किरण लहामटे आणि भाजपचे उमेदवार वैभव पिचड यांच्यात चुरशीची लढत झाली होती. यावेळी डॉ. किरण यमाजी लहामटे १,१३,४१४ मतांनी विजयी झाले होते. तर भाजप उमेदवार वैभव मधुकरराव पिचड यांचा ५७, ६८९ मतांनी पराभव झाला होता. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांनी शिवसेनेच्या मधुकर तळपाडे यांना धुळ चारली होती. २०१४ विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांनी शिवसेनेचे उमेदवार मधुकर तळपाडे यांचा २०,०६२ मतांनी पराभव केला होता.
हे ही वाचा -