एक्स्प्लोर

जालना विधानसभा मतदारसंघ | जालन्यात वंचितची काँग्रेसला धास्ती

वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेसला बसण्याची दाट शक्यता आहे, त्याती प्रचिती लोकसभा निवडणुकीत देखील आली. जालना विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद फारशी नाही. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 2014 च्या निवडणुकीप्रमाणे मुस्लिम आणि दलित मतदारांची मते घेतली तर ती साहजिकच काँग्रेससाठी ही धोका ठरतील.

 

जालना : जालना बियाणांची पंढरी आणि किंग ऑफ स्टील सिटी अशी जागतिक पातळीवर ओळख असलेले शहर आहे. जालना विधानसभा मतदार संघ 75 टक्के शहरी आणि 25 टक्के ग्रामीण मतदारांमध्ये विभागलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीत जालना शहराला महत्त्व असते. 1990 पूर्वी एक अपवाद वगळता हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता. 1990 मध्ये प्रथमच शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर झालेल्या सलग सहा निवडणुकींपैकी दोन वेळा काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि चार वेळेस शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले.

मुस्लिम, दलित तसेच मराठी मातृभाषा नसलेल्या मतदारांची संख्या या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे. पूर्वीच्या काळी मुस्लीम आणि दलित मतदार काँग्रेसची हक्काची वोट बँक म्हणून ओळखली जात होती. परंतु गेल्या 15-20 वर्षांत त्यात हळूहळू बदल होत गेला. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाकडून उभे राहिलेले अब्दुल रशीद या मतदारसंघातून पराभूत झाले असले तरी त्यांनी घेतलेल्या मतांमुळे काँग्रेसचा परंपरागत मतदार दुरावल्याचे स्पष्ट झाले. 2014 मध्ये चौरंगी लढतीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले तरी त्यांचे मताधिक्य केवळ 296 मतांचे एवढे कमी राहिले.

2014 जालना विधानसभा निवडणूक निकाल

अर्जुन खोतकर (शिवसेना) - 45078 मतं

कैलास गोरंट्याल (काँग्रेस) - 44782 मतं

अरविंद चव्हाण (भाजप) - 37591 मतं

अब्दुल रशीद (बसपा) - 36350 मतं

2019 च्या विधासभा निवडणुकीत शिवसेनेकडून मंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल यांची उमेदवारी निश्चित आहे. 2014 प्रमाणे जर शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढल्यास भाजपकडून खासदार रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांना उमेदवारी मिळू शकते. भाजपकडून त्यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. दरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र नुकत्याच झालेल्या वंचित आघाडीच्या मुलाखतींमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सर्वच पक्षांच्या गोट्यात वंचित आघाडीमुळे चिंता पसरली आहे.

वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेसला बसण्याची दाट शक्यता आहे, त्याती प्रचिती लोकसभा निवडणुकीत देखील आली. जालना विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद फारशी नाही. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 2014 च्या निवडणुकीप्रमाणे मुस्लिम आणि दलित मतदारांची मते घेतली तर ती साहजिकच काँग्रेससाठी ही धोका ठरतील. दलित, मुस्लीम, ख्रिश्चन इत्यादी समाजघटकतील एक लाखापेक्षा अधिक मतदार या विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी किंवा शिवसेना-भाजप युतीच्या विजयामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची दाणादाण उडवून जालना लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांना मोठे मताधिक्य मिळाले. त्यांनी काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांचा तबल 3 लाख 32 हजार 815 मतांनी पराभव केला. यात जालना विधानसभा मतदार संघात दानवे यांना 41 हजार 815 मतांची आघाडी होती. लोकसभा निवडणुकीतील याच प्रभावाचा फायदा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न युतीच्या उमेदवाराकडून होईल.

2019 लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते

रावसाहेब दानवे (भाजप) - 698019 मतं

विलास औताडे (काँग्रेस) - 365204 मतं

शरद वानखेडे (वंचित बहुजन आघाडी) - 77158 मतं

जालना विधानसभा क्षेत्रात एकूण मतदार संख्या 2 लाख 90 हजार 207 एवढी आहे. यावेळी तिरंगी लढत झाल्यास विजयी उमेदवाराचे मताधिक्य कमी असणार यात शंका नाही. मतदारसंघातील प्रश्न शहरी भागाशी निगडीत असून, यात पाणीपुरवठा, रस्ते, शहरांतर्गत पाणीपुरवठा, स्टील औद्योगिक वसाहत विकास, सिड पार्क, मोसंबी प्रक्रिया केंद्र इत्यादी अनेक प्रश्न मागच्या 20 वर्षापासून निवडणुकीचे मुद्दे राहिले आहेत. मात्र हे प्रश्न आद्यपही सुटले नसल्याने यावेळी देखील या मुद्यांवर मतदारांना आकर्षित करण्याचे काम उमेदवार करतील यात शंका नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेहHasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Embed widget