एक्स्प्लोर

Madha Vidhan Sabha Election: डमी उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांना डोकेदुखी; माढ्यात 4 अभिजीत पाटील, 2 रणजीत सिंह शिंदे निवडणुकीच्या रिंगणात

माढा (Madha) विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्जाची मुदत संपल्यानंतर नवी खेळी समोर आली आहे. माढ्यात एकाच नावाचे चार-चार, तीन-तीन उमेदवार रिंगणात...

Madha Vidhan Sabha Election 2024 : माढा : माढा मतदारसंघात (Madha Constituency) अभिजीत पाटील (Abhijeet Patil) नावाचे चार, रणजीत सिंह शिंदे (Ranjeet Shinde) नावाचे दोन उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. तर करमाळ्यात तीन संजय शिंदे (Sanjay Shinde) रिंगणात उतरले आहेत. नावात साधर्म्य असलेल्या या उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढणार यात काही शंका नाही. 

माढा (Madha) विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्जाची मुदत संपल्यानंतर नवी खेळी समोर आली आहे. राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटील यांना तुतारी मिळाल्यानंतर अभिजीत पाटील नावाचे चार उमेदवार माढ्याच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तशीच परिस्थिती आमदार शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या बाबतही होत आहे. रणजीत सिंह शिंदे नावाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. करमाळा मतदारसंघातही आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात त्यांच्याच नावाचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 

एकंदरीत नावाच्या साधर्म्यामुळे ज्या पद्धतीनं एकाच नावाचे अनेक उमेदवार रिंगणात असल्यानं मतदारांचा संभ्रम करण्याचा हा प्रकार असतो. त्यात माढ्यात चुरस जास्त असल्यानं माढ्यातील चार अभिजीत पाटलांपैकी तुतारीच्या अभिजीत पाटलांना किती फटका बसणार? हेही पाहावं लागणार आहे. तशीच परिस्थिती आमदार शिंदे यांचे पुत्र आणि अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या बाबतही होणार असून दोन रणजीत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आमदार शिंदे यांच्या मुलाला फटका बसणार का? हेदेखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या तुतारीला साधर्म्य असणाऱ्या पिपाणी या चिन्हामुळे शरद पवार गटाला अनेक मतदारसंघात मोठा फटका बसला होता. आता नावात साधर्म्य असणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढल्यानं मतदारांचा संभ्रम देखील वाढणार आहे. माढा मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून अभिजीत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अभिजीत धनंजय पाटील यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय अभिजीत अण्णासाहेब पाटील, अभिजीत तुळशीराम पाटील असे चारजण एकाच नावाचे उमेदवार माढ्यात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत सिंह शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवीत असताना येथूनच रणजीत मारुती शिंदे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. 

करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार संजय मामा विठ्ठलराव शिंदे हे अपक्ष निवडणूक रिंगणात असून येथूनच संजय लिंबराज शिंदे आणि संजय वामन शिंदे अशा दोघांनी उमेदवारी दाखल केली आहे. आता मतदारांना हवा असणारा नेमका उमेदवार शोधताना एकतर त्याचं नाव लक्षात ठेवावं लागणार आहे किंवा त्यांचं चिन्ह तरी डोक्यात ठेवावं लागणार आहे. निवडणुकीतल्या या खेळी अनेक वर्षांपासून चालत आल्या असल्या तरी काही वेळेला मुख्य उमेदवाराला याचा फटका बसलेला दिसला नाही. त्यामुळे शरद पवार गटाचे अभिजीत पाटील असतील किंवा अपक्ष आमदार संजय मामा शिंदे असतील, यांना आपलं नाव आणि चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवताना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrirang Barne  महायुतीचा धर्म पाळणार,शिवसेना सुनील शेळकेंसोबतABP Majha Headlines : 10 PM : 30 OCT 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaShankar Jagtap Vs Rahul Kalate | दिवाळी फराळाच्या निमित्ताने जगताप-कलाटेंच्या एकमेकांना शुभेच्छाAaditya Thackeray Majha Vision | मविआत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? आदित्य ठाकरे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम
पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम
India China complete Disengagement in Depsang Demchok : भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई
Embed widget