एक्स्प्लोर
Advertisement
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांना प्रहारकडून लोकसभेच्या उमेदवारीची शक्यता
वैशाली येडे या शेतकरी विधवा आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या विशेषतः त्यांच्या जीवनावर आधारित नाटक तेरव नाटकात त्या जनाबाईची भूमिका करतात. वादग्रस्त ठरलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान त्यांना मिळाला होता.
यवतमाळ : अखिल भारतीय साहित्य संमेलनच्या उद्घाटका वैशाली येडे यांना प्रहारकडून लोकसभासाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. प्रहारकडून याबाबत वैशाली येडे यांना विचारणा झाली आहे, मात्र त्यांच्याकडून अजून दुजोरा आलेला नाही.
वैशाली येडे या शेतकरी विधवा आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या विशेषतः त्यांच्या जीवनावर आधारित नाटक तेरव नाटकात त्या जनाबाईची भूमिका करतात. वादग्रस्त ठरलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान त्यांना मिळाला होता.
वादानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला होता. यामुळे वैशाली सुधाकर येडे यांना संमेलनाच्या उद्घाटनाचा मान मिळाला होता.
वैशाली यांच्या पतीने सात वर्षापूर्वी आत्महत्या केली. त्यांना 2 मुले आहेत. तीन एकर शेती आहे. त्या सध्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत. एक वर्षापासून नाटक क्षेत्राशी त्या जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या जीवनावर प्रसिद्ध दिग्दर्शक हरीश इथापे यांनी 'तेरवं' नाटक लिहिले आहे. त्यात यांच्या जीवनाचा संघर्ष होता. त्या नाटकांत त्यांनी भूमिका देखील केली आहे.
माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार : वैशाली येडे यांची टीका
सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही. माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार आहे, अशा शब्दात वैशाली येडे यांनी 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात टीका केली होती. अडचणीच्यावेळी दिल्लीतच तर गल्लीतही बाईच कामी येते हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. आज दिल्लीची नाही तर गल्लीची बाई कामात आली आहे. आम्ही विधवा नाही एक महिला आहोत. नवरा कमकुवत होता तो गेला मी लढणार आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या.
ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच आमंत्रण रद्द केल्यानंतर उद्घाटक म्हणून काही नावं सुचवण्यात आली होती. संमेलनाचं उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात यावा, अशी मागणी आयोजकांकडून करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत महामंडळाने यवतमाळमधील कळंब तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली सुधाकर येडे यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून मान दिला होता.
संबंधित बातम्या
सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह : संमेलनाध्यक्षा अरूणा ढेरे
आपण झुंडशाहीला बळी पडलो, माजी संमेलनाध्यक्षांचा घणाघात
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा साहित्य संमेलनाच्या उद्घाटक पदासाठी या तीन नावांची शिफारस मराठी साहित्य संमलेन अध्यक्षा अरुणा ढेरेंना डॉ. मुणगेकरांचं खुलं पत्र 92 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरेंची निवडनयनतारा सहगल यांच्या अपमानावर विविध मान्यवरांचा संमेलनावर बहिष्कार
मराठी साहित्य संमेलनात वाचलं न जाणारं नयनतारा सहगल यांचं 'ते' भाषण
... तर मनसे उधळणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!
नयनतारा सहगल यांना विरोध नाही : राज ठाकरे
नयनतारा सहगल यांच्या अपमानाचे साहित्य विश्वात पडसाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement