सोलापूरसह माढा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात 130 टेबलवर 27 फेऱ्यात मतमोजणी
लोकसभा निवडणुकीत अत्यंत चर्चेच असणारे मतदारसंघ म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झालीय.
Solapur Madha Loksabha Election Result News : राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण देशात कोणाची सत्ता येणार हे ठरवणारा आजचा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या लोकसभा निवडणुकीत अत्यंत चर्चेच असणारे मतदारसंघ म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झालीय. 130 टेबलवर 27 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात कोण बाजी मारणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारंघातील स्ट्राँगरुम उघडल्या आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात 6971 पोस्टल मतदानाची मोजनीला होणार सुरुवात झाली आहे. माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात130 टेबलवर 27 फेऱ्यात मतमोजणी सुरु आहे. सध्या पोस्टल मतमोजणी सुरु आहे. सोलापूरसाठी 3511 आणि माढ्यासाठी 6971 मतांची मोजणी सुरु आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी लढत होत आहे. तर माढ्यात रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील हे मैदानात होते. आता यामध्ये कोण बाजी मारणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)