एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024: काँग्रेसचा सर्वात मोठा डाव, NDAच्या काठावरच्या बहुमताने आशा पल्लवित; नितीशकुमार आणि टीडीपीशी चर्चा करणार

Maharashtra Politics: भाजपला 300 पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने हालचाली सुरु केल्या आहेत.

मुंबई: देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्या साडेचार तासांमध्ये देशभरातली निकालाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आघाडी 400 पारचा आकडा पार करेल, असा दावा केला होता. मात्र, सध्याचे चित्र पाहता एनडीए आघाडी 300 जागांच्या पलीकडे जाणेही अवघड दिसत आहे. लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) एकूण 543 जागांपैकी 270 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर इंडिया आघाडी 251 जागांवर आघाडीवर आहे. 

ही परिस्थिती पाहता भाजपप्रणित एनडीए आघाडीला काठावरचे बहुमत मिळण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठीची मॅजिक फिगर 272 इतकी आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता एनडीए आघाडी बहुमताचा आकडा जेमतेम गाठेल, असे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात अस्थिर राजकीय परिस्थिती निर्मिती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सक्रिय झाला आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वाकडून तेलुगू देसम पार्टी आणि नितीश कुमार यांच्याशी बोलणी केली जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. काँग्रेसने तेलुगू देसम आणि नितीश कुमार यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरु केल्यास भाजप काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आंध्र प्रदेशात तेलुगू देसमचे 16 उमेदवार आघाडीवर आहेत. तर नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हा पक्ष 12 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे इंडिया आघाडी बहुमताच्या आकड्याच्या नजीक पोहोचल्यास तेलुगु देसम आणि नितीश कुमार यांची मदत घेतली जाऊ शकते. 

उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का

राम मंदिर आंदोलन, अयोध्येतील राम मंदिर आणि हिंदुत्त्वाचा अजेंडा यामुळे उत्तर प्रदेशात भाजपला मोठे यश मिळेल, अशी चर्चा होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात 63 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात 37 जागांवर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आघाडीवर आहे. तर 34 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर सात जागांवर काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात  एकूण 44 जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. तर हरियाणातही काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. हरियाणात काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहेत.  हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

आणखी वाचा

वंचितला मतदारांनी नाकारले; पुणे, बीड, धाराशिव, परभणी अन् अकोल्यातून कुणाला किती मतं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget