महाविकास आघाडीच्या बैठकीत काय ठरलं? कोणाला किती जागा मिळणार?
महाविकास आघाडीच्या बैठकीत कोण किती जागावार लढणार याबाबत चर्चा झाली आहे. दरम्यान, या बैठकीत वंचित शिवाय निवडणुका लढण्याच्या पर्यायावर चर्चा झाल्याची माहिती देखील सुत्रांनी दिलीय.
Mahavikas Aghadi meeting : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु झालीय. सर्वच पक्षांच्या हालचालींना वेग आलाय. भाजपनं महाराष्ट्रातील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मात्र, अद्याप महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi meeting) जागावाटपाचा पेच सुटला नाही. कोण किती जागावार लढणार याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. दरम्यान, या बैठकीत वंचित शिवाय निवडणुका लढण्याच्या पर्यायावर चर्चा झाल्याची माहिती देखील सुत्रांनी दिलीय.
कोणाला किती जागा मिळणार?
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या काल मुंबईत बैठक पार पडली. यामध्ये जागावाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आहे. वंचितने 17 जागा लोकसभेसाठी मागितल्यानं वंचित शिवाय पर्यायाचा विचार झाल्याची माहित सुर्तांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार गटावा 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काँग्रेसला 18 ते 20 जागा मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्याचबरोबर उर्वरित जागा शिवसेना आणि इतर मित्रपक्ष राजू शेट्टी आणि इतरांना दिल्या जाणार आहेत.
दोन दिवसात महाविकास आघाडीची अधिकृत जागा वाटपाची घोषणा होणार
दरम्यान, आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबईतील शिवाजी पार्क इथं जाहीर सभा होणार आहे. या सभेचा समारोप होताच दोन दिवसात महाविकास आघाडीची अधिकृत जागा वाटपाची घोषणा केली जाणार आहे. राज्यातील नेते एकत्रित येत लोकसभा जागावाटपा संदर्भात पत्रकार परिषद घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे.