एक्स्प्लोर
Loksabha Election 2019 : तापमानाचा पारा चढला, मतदानाचा टक्का घसरला
मतदानाच्या नोंदीत दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर आघाडीवर आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत 54 टक्के मतदान झालं. तर सगळ्यात कमी मतदानाची नोंद पुण्यात झाली.
![Loksabha Election 2019 : तापमानाचा पारा चढला, मतदानाचा टक्का घसरला Loksabha Election 2019 Voting percentage decreases as temperature increases Loksabha Election 2019 : तापमानाचा पारा चढला, मतदानाचा टक्का घसरला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/23163548/Maharashtra-voting-and-heat-12pm.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यभरात सरासरी 46 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तापमानाचा पारा वाढल्यानंतर राज्यभरात मतदानाची टक्केवारी घसरल्याचं चित्र आहे.
राज्यभरात सध्या तापमान चांगलंच वाढत आहे. उन्हात फिरताना अंगाची लाही लाही होत असल्यामुळे अनेक जण घरी बसणं पसंत करतात. मात्र मतदानाच्या दिवशी तरी मतदारांनी आपला हक्क बजावणं अपेक्षित आहे.
बारामती, माढा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, रावेर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड या 14 मतदारसंघात मतदान होत आहे.
मतदानाच्या नोंदीत दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर आघाडीवर आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत 54 टक्के मतदान झालं. तर सगळ्यात कमी मतदानाची नोंद पुण्यात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत पुण्यात केवळ 36 टक्केच मतदान पार पडलं.
VIDEO | मतदान करा, पाच रुपयात चहा मिळवा, सांगलीतील चहावाल्याचा फंडा | सांगली | एबीपी माझा
दुपारी 3 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी -
मतदारसंघ टक्केवारी तापमान (अंश सेल्सिअस)
जळगाव 42.62 % 44
रावेर 46.04 % 42
जालना 49.40 % 41
औरंगाबाद 47.36 % 40
रायगड 47.97 % 33
पुणे 36.29 % 40
बारामती 45.35 % 39
अहमदनगर 45.65 % 40
माढा 44.13 % 40
सांगली 46.64 % 38
सातारा 44.77 % 39
रत्नागिरी-सिंधुदुर्ग 47.18 % 38
कोल्हापूर 54.24 % 39
हातकणंगले 52.17 % 39
एकूण - 46.28 %
VIDEO | पाठकबाई, मुग्धा गोडसे, मोहन आगाशे यांच्यासह मराठी कलाकारांचं मतदान | पुणे | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)