एक्स्प्लोर
Advertisement
पश्चिम बंगालमध्ये बांग्लादेशी अभिनेत्याकडून तृणमूल काँग्रेसचा प्रचार, गृहमंत्रालयाने अहवाल मागितला
बांग्लादेशी सुपरस्टार फिरदौस अहमदने उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात रायगंज लोकसभा मतदारसंघातील टीएमसीचे उमेदवार कन्हय्या लाल अग्रवाल यांचा प्रचार केला होता. फिरदोस अहमदने पश्चिम बंगालच्या सीमेवरील रायगंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला मत देण्याचं आवाहन केलं आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेससाठी अनेक बांग्लादेशी कलाकार प्रचार करत आहेत. भाजपने यावर आक्षेप घेतला आहे. तर सोशल मीडियावरही अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. बांग्लदेशी अभिनेता फिरदौस अहमद आणि गाजी अब्दुन नूर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बांग्लादेशी सुपरस्टार फिरदौस अहमदने उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात रायगंज लोकसभा मतदारसंघातील टीएमसीचे उमेदवार कन्हय्या लाल अग्रवाल यांचा प्रचार केला होता. फिरदोस अहमदने पश्चिम बंगालच्या सीमेवरील रायगंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला मत देण्याचं आवाहन केलं आहे.
भाजपचा आक्षेप
हे प्रकरण समोर आल्यानंतर फिरदोस आणि नूरच्या अडचणी वाढल्या आहेत. पश्चिम बंगाल भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे या दोन्ही बांग्लादेशी कलाकारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे दोघे कोणत्या अधिकाराने एखाद्या पक्षाच्या समर्थनार्थ निवडणूक प्रचार करत आहे? असा प्रश्न भाजपने विचारला आहे.
भाजपचे पश्चिम बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, "बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं बांग्लादेशवर थोडं जास्तच प्रेम आहे. बांग्लादेशी घुसखोरांसाठी त्यांचं प्रेम सख्ख्या मावशीपेक्षाही जास्त आहे. आता बांग्लादेशी घुसखोरांचं मत निश्चित करण्यासाठी त्या प्रचारातही बांग्लादेशी कलाकारांना बोलवत आहेत. हा पश्चिम बंगालच्या जनतेचा अपमान नाही का?"
गृहमंत्रालयाने अहवाल मागितला
यानंतर गृहमंत्रालयाने सिलीगुडी प्रशासनाकडून अहवाल मागितला आहे. बांग्लादेशी सुपरस्टाने प्रचार केला होता का? अशी विचारणा गृहमंत्रालयाने केली आहे. अद्याप प्रशासनाने अहवाल सादर केलेला नाही. तर दुसरीकडे या वादानंतर बांग्लादेशच्या उच्चायुक्तांनी फिरदोस अहमदला तातडीने मायदेशी परत येण्याचे निर्देश दिले आहेत.
निवडणूक आयोग, परराष्ट्र मंत्रालय आणि गृहमंत्रालयाचे नियम
एखादा परदेशी नागरिक इथे येऊन निवडणूक प्रचारात सामील होऊ शकतो की नाही, याचा उल्लेख निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये नाही.
तर परराष्ट्र मंत्रालय कोणत्याही परदेशी नागरिकाला व्हिसा जारी करतं. पण त्याआधी जी पडताळणी होते, ती गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येते. ज्या व्यक्तीला व्हिसा जारी केला जाणार आहे, तो या देशात कोणत्या उद्देशाने आला आहे, याचा स्पष्ट उल्लेख करतो"
या माहितीवरुन हे तर स्पष्ट झालं की, निवडणूक आयोग आणि पराराष्ट्र मंत्रालयाच्या नियमांनुसार, फिरदोसने निवडणूक प्रचार करणं हे बेकायदेशीर नाही. पण यानंतर गृहमंत्रालयाच्या नियम, कायद्याची पाळी येते.
परदेशी नागरिकाने ज्या उद्देशासाठी भारतात येण्याचा उल्लेख केला होता, पण त्याउलट कामांमध्ये तो सहभागी होत असेल, अशी तक्रार गृहमंत्रालयाकडे आली तर त्या व्यक्तीविरोधात कारवाई होऊ शकते.
एखादा परदेशी नागरिक भारतात येतो, तेव्हा त्याच्या व्हिसाच्या शर्तींमध्ये उल्लेख असतो की, तो कोणतं काम करु शकतो आणि कोणतं नाही. विशेष म्हणजे बांग्लादेशमधून भारत येण्या-जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नसते. केवळ परमिटची गरज असते.
सोशल मीडियावरही आक्षेप
दुसरीकडे सोशल मीडियावरही अनेकांनी बांग्लादेशी कलाकारांकडून तृणमूलचा प्रचार करण्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अनेकांनी भारतात राहणाऱ्या अवैध बांग्लादेशी नागरिकांचाही मुद्दा उपस्थित केला आहे. तर काहींनी निवडणूक आयोगाने टीएमसीवर बंदी घालून ममतांना जेलमध्ये पाठवाव. त्या बांग्लादेशी नागरिक आणि अभिनेत्यांकडून प्रचार का करवून घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement