Lok Sabha Election Result 2024: पहिल्या 15 मिनिटात पहिले कल शक्य, सुपरफास्ट निकाल 'एबीपी माझा'वर, निकाल कुठे आणि कसा पाहाल?
Lok Sabha Election 2024: संपूर्ण देशाला लोकसभा निवडणुकीची उत्सुकता लागली आहे. उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय 14 टेबलवर मतमोजणी होईल. म्हणजे प्रत्येक लोकसभेत एकूण 84 टेबलवर मतमोजणी होईल.
मुंबई: लोकसभा निवडणूक निकाल 2024 काही मिनिटांवर येऊन ठेपला आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात आणि त्यापैकी महाराष्ट्रातील 48 जागांवर कोण बाजी मारणार हे 4 जून रोजी जाहीर होईल. देशात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रातील (Loksabha Election) 48 मतदारसंघात 5 टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात एकूण 60.78 टक्के मतदानाची नोंद झाली. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यात 62.71 टक्के मतदानाची नोंद झाली.
देशाचा हा निकाल जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक यंत्रणा जशी सज्ज आहे, तशीच एबीपी माझाची टीमही सज्ज झाली आहे. एबीपी माझा चॅनलवर सकाळी 6 वाजल्यापासून निकालाचे कव्हरेज सुरु होईल. प्रत्यक्ष मतमोजणी 8 वाजता सुरु होईल. निवडणूक आयोग सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी सुरु करेल. त्यानंतर मग EVM उघडले जातील. प्रत्येक मतदारसंघात किती मतदान झालं आहे, त्यानुसार मतमोजणीच्या फेऱ्या होतील. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय 14 टेबलवर मतमोजणी होईल. म्हणजे प्रत्येक लोकसभेत एकूण 84 टेबलवर मतमोजणी होईल.
लोकसभा निकाल कुठे, कसा पाहाल?
लोकसभा निवडणुकीचे निकाल सर्वात अचूक आणि वेगवान तुम्ही एबीपी माझा चॅनलवर पाहू शकाल. सकाळी 6 पासून हे निकालाचं कव्हरेज सुरु होईल. याशिवाय तुम्ही एबीपी माझाची वेबसाईट marathi.abplive.com वर निकालाचे ताजे अपडेट आणि मतदारसंघनिहाय निकाल एकाच ठिकाणी एकाच क्लिकवर पाहू शकाल. एबीपी माझाच्या वेबसाईटवर सकाळी 8.15 वाजता पहिले कल हाती पाहायला मिळू शकतात.
याशिवाय एबीपी माझाचे यूट्यूब चॅनलवर लाईव्ह टीव्ही, चर्चा, दिग्गजांचं विश्लेषण हे पाहू शकाल. त्यासाठी एबीपी माझाचं यूट्यूबचॅनल
www.youtube.com/abpmajhatv सबस्क्राईब करा.
लोकसभा निवडणूक निकाल तुम्ही एबीपी माझाच्या फेसबुक पेजवरही पाहू शकाल. निकालाचे प्रत्येक अपडेट एबीपी माझा www.facebook.com/abpmajha पाहू शकाल.
याशिवाय एबीपी माझाच्या एक्स हॅण्डलवर निकालाच्या प्रत्येक पोस्ट अपडेट होत राहतील. त्यासाठी twitter.com/abpmajhatv फॉलो करा.
तरुणांचं सध्याचं सर्वात आवडता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरही तुम्हाला निकालाचा अपडेट मिळतील. त्यासाठी तुम्ही एबीपी माझाच्या इन्स्टा अकाऊंटला www.instagram.com/abpmajhatv/ फॉलो करा.
EVM म्हणजे काय?
Electric voter machine म्हणजेच त्याला आपण EVM म्हणतो. EVM चा प्रस्ताव सर्वात आधी १९७७ मध्ये मांडण्यात आला. त्यानंतर १९७९ मध्ये पहिल्यांदा EVM तयार करण्यात आले. त्यानंतर हळू हळू संपूर्ण देशात EVM वर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. देशात दोन ठिकाणी EVM मशीन तयार केले जातात. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन्ही कंपन्या भारत सरकारच्या मालकीचे आहेत.
मतमोजणी कशी होते?
मतदान झाल्यानंतर EVM ला सील मारून त्याला एका स्टोअर रूममध्ये ठेवण्यात येते. त्याच्या सुरक्षेसाठी केंद्रीय दलाचे जवान चोवीस तास तैनात असतात.
जेव्हा निकालाचा दिवस असतो तेव्हा ती मशीन स्टोअर रूममधून बाहेर काढण्यात येते. मतमोजणी करत असताना एका वेळी फक्त 14 EVM मशीनचीच मोजणी केली जाते. त्यासाठी 14 टेबलची व्यवस्था करण्यात येते.
प्रत्येक टेबलवर एक निवडणूक अधिकारी, उमेदवार आणि त्या त्या पक्षाचा एक सदस्य असतो. मतमोजणी सुरू असताना तो या संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवतो. उमेदवाराने EVM हात लावू नये यासाठी एक बरिकेट्स मध्ये ठेवण्यात येतो.
सर्वात आधी पोस्टल मतांची होते मोजणी?
सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होते. त्यानंतर अर्ध्या तासाने EVM मतांची मोजणी होते. EVM सुरू करण्याआधी त्याच्या सीलची तपासणी केले जाते. EVM सोबत कोणतीही छेडछाड तर झाली नाही ना? याची तपासणी मतमोजणी अधिकारी करून घेतो. त्यानंतरच मतमोजणीसाठी ते मशीन सुरू करण्यात येते.
त्यानंतर रिझल्ट बटण दाबलं जात. कोणत्या उमेदवाराला किती मते पडली याची आकडेवारी समोर येते. त्यांनतर ही आकडेवारी फॉर्म क्रमांक 17C मध्ये नोंदवली जाते. त्यावर जो कोणी उमेदवाराच्या बाजूने मतमोजणीसाठी उपस्थित आहे त्याची सही घेण्यात येते. त्यानंतर त्या फॉर्मला रिटर्निंग ऑफिसर्सकडे पाठवण्यात येतं.
आलेल्या निकालाला एका ब्लॅक अँड व्हाईट बोर्डवरती लिहण्यात येतं. प्रत्येक फेरीत होणाऱ्या मतमोजणीची आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला सांगण्यात येते. ही प्रक्रिया जोपर्यंत मतमोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत चालत राहते. शेवटी ज्या उमेदवाराला जास्त मते मिळाली अशा उमेदवाराला विजयाचं प्रमाणपत्र देऊन निवडणूक अधिकारी त्याला विजय घोषित करतात.
LIVE TV -
आणखी वाचा