एक्स्प्लोर

Lok Sabha Election Result 2024 : शरद पवारांना सहानुभूती होती, भुजबळांना उमेदवारी मिळाली असती तर वेगळं चित्र असतं, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

Unmesh Patil : नाशिक लोकसभा मतदारंसघात छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाली असती तर चित्र वेगळं दिसलं असतं, असं उन्मेष पाटील यांनी म्हटलं.

मुंबई : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Seat) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) राजाभाऊ वाजे यांनी मतमोजणीत मोठी आघाडी घेतली आहे.  शिवसेनेचे  उमदेवार आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे पिछाडीवर आहेत. नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात ही जागा सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार अशा चर्चा होत्या. मात्र, जागा वाटपात ही जागा महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा उमेदवारी जाहीर होण्यास उशीर होत असल्यानं निवडणूक लढवणार नसल्याचं म्हणत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती.  नाशिकमधून रामभाऊ वाजे आघाडीवर यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उन्मेष पाटील यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य केलं. 

उन्मेष पाटील यांनी काय म्हटलं?

पराभव झाल्यानंतर विश्लेषण करायला आपल्याला फार मुद्दे असतात. सांगलीत जर काँग्रेसची उमेदवारी घेतली असते तर ते पराभूत झाले असते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. यानंतर जी भावनिक स्थिती निर्माण झाली त्याचा फायदा विशाल पाटील यांना झाला, असं उन्मेष पाटील म्हणाले. 

पाहा व्हिडीओ :

शरद पवार साहेबांचं वय आणि त्यांचा आजार हे त्यांचं भांडवल आहे. शरद पवार यांना किती दगदग करायला लावायची असा विचार करुन आम्ही वेगळा विचार केला होता. लोकांच्या पर्यंत वरवरचं दिसणारं चित्र असतं. कोण बरोबर आणि कोण चूक याबाबत लोक जे विचार करतात, असं उन्मेष पाटील म्हणाले. जोपर्यंत 75 टक्के मतमोजणी होत नाही तोपर्यंत त्याचं स्पष्टपणे सांगता येणार नाही. आतापर्यंत जे कौल आले आहेत ते सहानुभूती आणि भावनांना लोकांनी साथ दिल्याचं दिसतंय, असं उन्मेष पाटील म्हणाले. 

विधानसभेला लोकसभेच्या निवडणुकीचा परिणाम जाणवेल, असं वाटत नसल्याचं उन्मेष पाटील म्हणाले. लोकसभेला लोक वेगळा विचार करतात आणि विधानसभेला वेगळा विचार करतात असं उन्मेष पाटील यांनी सांगितलं. जो उमेदवार विजयी होईल त्याला विधानसभेला उमेदवारी दिली जाईल, असं उन्मेष पाटील म्हणाले. 

नाशिकचा जागा आम्हाला मिळाली असती छगन भुजबळ लोकसभेला उभे राहिले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं. छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी काम केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकची जागा मिळाली असती तर त्याचा परिणाम राज्यातील इतर जागा निवडून येण्यामध्ये झाला असता, असं उन्मेष पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या : 

Kolhapur Loksabha Election Result : कोल्हापुरात मान आणि मत गादीलाच; शाहू महाराजांची निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल

ओमराजे निंबाळकरांची विजयाच्या दिशेनं वाटचाल,1 लाखाहून अधिक मताधिक्य, अर्चना पाटलांना धक्का बसण्याची शक्यता

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!

व्हिडीओ

Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
Davkhare vs Abitkar Thane : Aapla Dawakhana त साडीचं दुकान? डावखरेंच्या प्रश्नावर आबीटकरांचं उत्तर
Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Bharatshet Gogawale On Danveपैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडीओ दानवेंकडून ट्विट,गोगावले म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
MNS Sandeep Deshpande Video: आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं, म्हणाले, 'लाडक्या बहि‍णींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल'
देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं, म्हणाले, 'लाडक्या बहि‍णींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल'
Devendra Fadnavis: फलटणमध्ये आयुष्य संपवलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये...
फलटणमध्ये आयुष्य संपवलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये...
Embed widget