एक्स्प्लोर

Lok Sabha Election Result 2024: 'मनोज जरांगेंचा विशेष परिणाम नाही, अजितदादांनी मनापासून काम केले'; राधाकृष्ण विखे पाटील यांनी निकालापूर्वी मांडली भूमिका

Lok Sabha Election Result 2024: देशात 350 पेक्षा जास्त जागा एनडीएला मिळत असून देशातील जनतेने पुन्हा तिसऱ्यांदा मोदी याना पंतप्रधान करण्यासाठी मतदान केल्याचे विखे यांनी सांगितले .

Loksabha Election Result 2024: केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी लोकांनी मतदान केले. तसेच राज्यातही महायुतीला जनता बहुमत देणार, हे उद्या समोर येईल. उद्या निकाल लागणार असल्याने एक्झिट पोल्सवर आता बोलण्यापेक्षा आपण थोडी निकालाची प्रतिक्षा करु, असं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. उद्या मतमोजणी असल्याने आता राजकीय मंडळी देव दर्शन करताना दिसत असून आज विखे पाटील कुटुंबासह हेलिकॉप्टरने विठ्ठल दर्शनासाठी आले होते. येथूनच ते तुळजापूरकडे रवाना झाले.

राज्यात 40 पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळणार-

देशात 350 पेक्षा जास्त जागा एनडीएला मिळत असून देशातील जनतेने पुन्हा तिसऱ्यांदा मोदी याना पंतप्रधान करण्यासाठी मतदान केल्याचे विखे यांनी सांगितले . तसेच राज्यातही किमान 40 पेक्षा जास्त जागा मिळतील असे संकेतही दिले. नगर जिल्ह्यातील त्यांचे पुत्र सुजय विखे यांच्यासह शिर्डी अशा दोन्ही जागा मोठ्या फरकाने जिंकणार असल्याचा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. अजित पवार हे महायुतीतील नेते असून त्यांनी मनापासून राज्यभर महायुतीचा प्रचार केला आहे . अजित पवार गटाने महायुतीचे काम केले नाही, असे वक्तव्ये करून त्यांचेकडे संशयाचे वातावरण निर्माण करणे चुकीचे असल्याचे  विखे पाटील यांनी सांगितले . 

मनोज जरांगेंचा निवडणुकीवर फारसा परिणाम नाही-

उद्याच निकाल लागत असल्याने कोणाला फायदा झाला आणि कोणाला तोटा झाला हे समोर येणार असल्याचेही विखे यांनी सांगितले. मनोज जरंगे यांचा या निवडणुकीवर फारसा परिणाम झाला असे वाटत नाही, असा दावा विखे पाटील यांनी केला. मराठा आरक्षणासाठी आम्हीसुद्धा पुष्कळ काम केले आहे. त्यामुळे असे कोणी म्हणत असतील कि आम्हीच फक्त आरक्षणासाठी लढा देतोय. तर मराठा आरक्षणासाठी सुरुवातीला आंदोलन सुरु झाले. 58 मोर्चे निघाले त्यावेळी या आंदोलनातील कोणीच नव्हते, असे वक्तव्य देखील विखे पाटील यांनी करीत जरांगे व त्यांचे समर्थकांना टोला लगावला. 

मविआ आणि महायुतीमध्ये रस्सीखेच

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. यानंतर शिवसेनेतील शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजपसोबत गेला होता. त्यामुळे भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला मोठे यश मिळेल, असा अंदाज होता. मात्र, एक्झिट पोलची आकडेवारी पाहता लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात दिसली रस्सीखेच. महायुती व मविआला निम्म्या निम्म्या जागांचा अंदाज. महायुतीला 24 तर मविआला 23 जागांचा अंदाज. भाजप 17, तर शिंदे गटाला 6 जागांचा अंदाज. अजित पवार गटाला फक्त एक जागेवर विजय शक्य. मविआमध्ये काँग्रेसला 8, ठाकरे गटाला 9 जागांचा अंदाज. शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज. महाराष्ट्रात महायुतीसह भाजपला मोठा तोटा शक्य. 2019 ला 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 17 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता. शिंदे गटाचा आकडाही 13 वरुन 6 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

इतर बातमाी:

एक्झिट पोल्समध्ये देशात पुन्हा मोदी सरकारचा अंदाज, शेअर बाजार उघडताच मोठी उसळी, सेन्सेक्स 2200 अंकानी वधारला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget