Lok sabha Election Result : लाखमोलाचे उमेदवार! 'या' उमेदवारांनी घेतली तब्बल 1 लाखांची आघाडी, विजयाचा मार्ग सुकर
लोकसभा निवडणूक निकालात देशातील काही उमेदवरांना अपेक्षित यश मिळाले आहे तर काही उमेदवारांना मोठा लीड मिळाला आहे. देशातील ज्या उमेदवारांना एक लाखापेक्षआ अधिक मताधिक्य मिळले अशा उमेदवारांविषयी जाणून घेऊया
मुंबई : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election Result) मतमोजणी सुरु झाल्यानंतर आता चार तास पूर्ण झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीचे सुरूवातीचे कल हाती आले असून त्यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरूद्ध महायुती (Mahayuti) अशी रंगतदार आणि घासून लढत सुरू आहे. अंतिम निकाल अगदी काहीच वेळात हाती येणार असून राज्यात कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.कोणाचे सरकार स्थापन होणार, हे चित्र स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणूक निकालात देशातील काही उमेदवरांना अपेक्षित यश मिळाले आहे तर काही उमेदवारांना मोठा लीड मिळाला आहे. देशातील ज्या उमेदवारांना एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळले अशा उमेदवारांविषयी जाणून घेऊया . देशातील या लाखमोलाच्या उमेदवारांवर एक नजर टाकू या.
लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालांची आकडेवारी समोर येत असून निवडणूक आयोगाच्या वेबसाईवर प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार सध्या महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. त्यामध्ये , दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या साईटवरील आकडेवारीनुसार लाखापेक्षा अधिक लीड घेतलेल्या उमेदवारांच्या मतांची माहिती देण्यात येत आहे.
प्रतिभा धानोरकर - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 12 पर्यंत झालेल्या मतमोजणीनंतर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर 1 लाख मतांनी आघाडीवर आहे. प्रतिभा धानोरकरांच्या विरोधात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार उभे होते.
ओमराजे निंबाळकर - धाराशिव लोकसभा मतदारसंघ
उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) नामांतर झाल्यानंतरची पहिलीच लोकसभा निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची ठरली. लोकसभा मतदारसंघाचे पहिले कल हाती आले असून 12 वाजेपर्यंतचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर, अर्चना पाटील पिछाडीवर आहेत.
नरेश म्हस्के- ठाणे लोकसभा मतदारसंघ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणेनगरीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान (Lok Sabha Election 2024) दुहेरी लढत पाहायला मिळाली. ठाणे लोकसभेचे शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना देखील एक लाखाचा लीड मिळाली आहे
राजाभाऊ वाजे - नाशिक लोकसभा मतदारसंघ
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ( ठाकरे गट ) राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत. व्या फेरी अखेर वाजे यांनी घेतली 1,47,012 आघाडी घेतली आहे. राजाभाऊ वाजे यांचा नाशिक लोकसभा मतदार संघातून विजय निश्चित आहे.
गोवल पाडवी - नंदुरबार लोकसभा मतदारसंघ (Nandurbar Loksabha)
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पहिला विजय जवळपास निश्चित झाला असून नंदुरबारमधून गोवाल पाडवी (Goval Padvi) हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. गोवाल पाडवी हे तब्बल 1 लाख 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे काँग्रेसचा महाराष्ट्रात पहिला विजय निश्चित मानला जात आहे. काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी यांना 18 व्या फेरीअखेर 1लाख 70 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
राहुल गांधी - वायनाड
राहुल गांधींनी वायनाडमधून मोठी लीड मिळवला असून राहुल गांधी दोन लाखा मतांनी आघाडीवर आहे.
पीयूष गोयल - उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी तब्बल 131898 मतांनी मतांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या स्थानावर काँग्रेस भूषण पाटील आहेत.
श्रीकांत शिंदे - ठाणे लोकसभा मतदारसंघ
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे.मतमोजणीला सुरूवात झाली असून कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे आघाडीवर आहेत. शिंदे 129725 मतांनी आघाडीवर आहेत.
महाविकास आघाडीमध्ये कल्याणची ही जागा ठाकरे गटाकडे आली आणि त्यांनी वैशाली दरेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली होती.