एक्स्प्लोर

ऐनवेळी हेमंत पाटील ऐवजी कोहळीकरांना तिकीट दिल्याचा शिंदेंना फटका; उमेदवार बदललेल्या मतदारसंघात सत्ता कुणाची?

Lok Sabha Election 2024 : ऐनवेळी हेमंत पाटील ऐवजी कोहळीकरांना तिकीट दिल्याचा शिंदेंना फटका बसल्याचं दिसत आहे. राज्यात ज्या पक्षांनी उमेदवार बदलले, त्या मतदारसंघात कुणी बाजी मारली आहे, ते जाणून घ्या.

Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात वारं फिरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एकहाती बहुमत मिळालं आहे. राज्यात अनेक मतदारसंघात काही पक्षांकडून उमेदवार बदलण्यात आले होते. महाराष्ट्रात उमेदवार बदलेल्या जागेवर कुणाचा विजय झाला आहे, हे जाणून घ्या. यादरम्यान, हिंगोलीमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर विजयी झाले आहेत, तर शिंदे गटाचे बाबूराव कोहळीकर यांचा पराभव झाला आहे. 

हिंगोलीत शिंदे गटाचे उमेदवार पराभूत 

हिंगोली मतदारसंघात हेमंत पाटील यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करुन त्यानंतर बाबूराव कोहळीकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. शिंदे गटाच्या पहिल्या यादीमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघात हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर हिंगोलीमध्ये कमालीचा रोष निर्माण पाहायला मिळाला होता. यानंतर भाजपच्या दबावामुळे एकनाथ शिंदे यांना हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करावी लागली आहे. हेमंत पाटील यांचा पत्ता कट करून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली. 

अकोल्यामध्ये भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी

अकोल्यात भाजपचे अनूप धोत्रे विजयी ठरले आहेत. अकोल्यात भाजपने उमेदवार बदलला होता. भाजपने संजय धोत्रे यांची उमेदवारी बदलून अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांना  तिकीट दिलं होतं. 2019 मध्ये अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे (Sanjay Dhotre) निवडून आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संजय धोत्रे यांची प्रकृती खालावली आहे. अंथरुणाला खिळून असल्याने ते बराच काळ सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे अकोला दौऱ्यावर आले होते. तेव्हाही खासदार संजय धोत्रे हे अकोल्यातील भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे भाजप नेतृ्त्त्वाने संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना अकोल्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. 

सांगलीत विशाल पाटील यांना जनतेचा कौल

सांगली लोकसभेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला आहे. सांगली लोकसभेवरूनही महाविकास आघाडीमध्ये तिढा पाहायला मिळाला होता. सुरुवातीला काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी जोर लावला जात होता. मात्र, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. सांगलीची जागा काँग्रेसला न सुटल्याने विशाल पाटील यांनी वेगळा निर्णय घेत अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांनी विजयाचा व्यक्त केलेला विश्वास खरा ठरला आहे. 

यवतमाळ-वाशिम

वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या पक्षाने यंदाची लोकसभा निवडणूक (Loksa Sabha Election) स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला. वंचित बहुजन आघाडाने यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Nashik) या लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवार बदलला. येथे नव्याने अभिजित लक्ष्मणराव राठोड यांना तिकीट देण्यात आलं. यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी अगोदर सुभाष खेमसिंग पवार यांना तिकीट दिले होते. उमेदवारी मिळाल्यानंतर खेमसिंग यांच्याकडून जोमात प्रचार केला जात होता. मात्र वंचितने ऐनवेळी खेमसिंग पवार यांना माघार घ्यायला लावली.

संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी

वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) मुंबई उत्तर पश्चिम (Mumvai North Weat Constituency) मतदारसंघातून उमेदवार बदलला होता. संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून आधी भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष संजीव कलकोरी हे उमेदवार होते, नंतर त्यांच्याऐवजी परमेश्वर रणशूर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. 

जळगाव

वंचित बहुजन आघाडीने जळगावात उमेदवार बदलला होता. जळगाव लोकसभा मतदारसंघात (Jalgaon Lok Sabha Constituency) सुरुवातीला वंचितकडून प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी माघार घेतल्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी युवराज जाधव (Yuvraj Jadhav) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

दिंडोरी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे एक लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा दारुण पराभव झाला आहे. भास्कर भगरे यांनी ही निवडणूक लढताना आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढली होती, त्यामुळे हा जनशक्तीचा विजय असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भगरे सर याच नावाने एक डमी उमेदवार भाजपने उतरवला होता त्यामुळे त्यांना एक लाख मते अपक्ष भगरे सर यांना मिळाली केंद्रीय मंत्र्यांनी हा माझ्या विरोधात डाव टाकला होता त्यामुळे माझे मताधिक्य कमी झाले असे देखील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार भास्कर भगरे यांनी मत व्यक्त केले आहे. दरम्यान, दिंडोरी लोकसभेसाठी वंचितने गुलाब बर्डे (Gulab Barde) यांना सुरुवातीला उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने त्यांच्या जागी मालती थविल (Malati Thavil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगर हादरले ! गल्लीत अपरात्री आलेल्या तरुणाला हरकलं,  राग मनात धरला, पोरं बोलवली अन्  क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं ..
संभाजीनगर हादरले ! गल्लीत अपरात्री आलेल्या तरुणाला हरकलं,  राग मनात धरला, पोरं बोलवली अन्  क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं ..
Thane Municipal Corporation: भाजपच्या तयारीनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा ठाण्यात स्वबळाचा शड्डू ठोकला! रात्रीच्या बैठकीत काय घडलं?
भाजपच्या तयारीनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा ठाण्यात स्वबळाचा शड्डू ठोकला! रात्रीच्या बैठकीत काय घडलं?
Virat Kohli: विराट कोहली आणि आरसीबीमध्ये नेमकं चाललंय तरी काय? सोशल मीडियावर अफवांचा धुमाकूळ
विराट कोहली आणि आरसीबीमध्ये नेमकं चाललंय तरी काय? सोशल मीडियावर अफवांचा धुमाकूळ
Vaibhav Lakshmi Rajyog 2025: अखेर वैभवलक्ष्मी कन्या, मकरसह 'या' 3 राशींवर प्रसन्न झालीच! दिवाळीतील राजयोग देणार पैसा, नोकरीत पगारवाढ, घर, आताच कसलीच चिंता नसेल..
अखेर वैभवलक्ष्मी कन्या, मकरसह 'या' 3 राशींवर प्रसन्न झालीच! दिवाळीतील राजयोग देणार पैसा, नोकरीत पगारवाढ, घर, आताच कसलीच चिंता नसेल..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : संसदेत आमचा आवाज दडपला जातो, राऊतांची भाजपवर टीका
100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर 16 ऑक्टोबर
Mahayuti Rift: 'ठाण्याचा महापौर BJP चाच होणार', आमदार संजय केळकरांनी शिंदे गटाला दिले खुले आव्हान
Maharashtra Politics: मंत्री कोकाटेंचे बंधू भारत कोकाटे BJP मध्ये, Uddhav Thackeray गटाला धक्का
Thackeray vs Shinde :'यंदा महापौर आपलाच', Matoshree बाहेर Shinde गटाच्या बॅनरबाजीने ठाकरेंना डिवचले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगर हादरले ! गल्लीत अपरात्री आलेल्या तरुणाला हरकलं,  राग मनात धरला, पोरं बोलवली अन्  क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं ..
संभाजीनगर हादरले ! गल्लीत अपरात्री आलेल्या तरुणाला हरकलं,  राग मनात धरला, पोरं बोलवली अन्  क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं ..
Thane Municipal Corporation: भाजपच्या तयारीनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा ठाण्यात स्वबळाचा शड्डू ठोकला! रात्रीच्या बैठकीत काय घडलं?
भाजपच्या तयारीनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा ठाण्यात स्वबळाचा शड्डू ठोकला! रात्रीच्या बैठकीत काय घडलं?
Virat Kohli: विराट कोहली आणि आरसीबीमध्ये नेमकं चाललंय तरी काय? सोशल मीडियावर अफवांचा धुमाकूळ
विराट कोहली आणि आरसीबीमध्ये नेमकं चाललंय तरी काय? सोशल मीडियावर अफवांचा धुमाकूळ
Vaibhav Lakshmi Rajyog 2025: अखेर वैभवलक्ष्मी कन्या, मकरसह 'या' 3 राशींवर प्रसन्न झालीच! दिवाळीतील राजयोग देणार पैसा, नोकरीत पगारवाढ, घर, आताच कसलीच चिंता नसेल..
अखेर वैभवलक्ष्मी कन्या, मकरसह 'या' 3 राशींवर प्रसन्न झालीच! दिवाळीतील राजयोग देणार पैसा, नोकरीत पगारवाढ, घर, आताच कसलीच चिंता नसेल..
Cough Syrup Death: विषारी कफ सिरपचा आणखी एक बळी, चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत, महिनाभर सुरु होते उपचार, नागपुरात मृतांची संख्या 18 वर
विषारी कफ सिरपचा आणखी एक बळी, चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत, महिनाभर सुरु होते उपचार, नागपुरात मृतांची संख्या 18 वर
Bandu Andekar: नातवाच्या खून प्रकरणात सहभागी असलेला बंडू आंदेकरकरचा आणखी एक कारनामा समोर; बिल्डरची फसवणूक करून फ्लॅट विकले अन् पैसेही खाल्ले
नातवाच्या खून प्रकरणात सहभागी असलेला बंडू आंदेकरकरचा आणखी एक कारनामा समोर; बिल्डरची फसवणूक करून फ्लॅट विकले अन् पैसेही खाल्ले
Digital Arrest In Mumbai: मुंबईत उद्योजक अन् पत्नीला 'डिजीटल अरेस्ट' दाखवून 58 कोटी रुपये लुटले; नेमकं काय घडलं?
मुंबईत उद्योजक अन् पत्नीला 'डिजीटल अरेस्ट' दाखवून 58 कोटी रुपये लुटले; नेमकं काय घडलं?
Maharashtra Rains Updates: 15 जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट; परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा भरली धडकी
15 जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट; परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा भरली धडकी
Embed widget