Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात! 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात; मतदानाचं संपूर्ण वेळापत्रक पाहा एका क्लिकवर...
Lok Sabha Election 2024 : देशात 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होत असून 1 जून 2024 पर्यंत निवडणुका घेण्यात येणार आहेत. मतदानाचं संपूर्ण वेळापत्रक पाहा एका क्लिकवर...
Lok Sabha Election 2024 Dates : अखेर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे. देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024 Voting) मतदान पार पडणार आहे. देशात 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 दरम्यान मतदान पार पडणार आहे. तसेच 4 जून 2024 ला मतमोजणी (Lok Sabha Election 2024 Counting) पार पडणार असून लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election 2024 Result) लागेल.
देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections will be held in 7 Phases)
- पहिला टप्पा : 19 एप्रिल 2024
- दुसरा टप्पा : 26 एप्रिल 2024
- तिसरा टप्पा : 7 मे 2024
- चौथा टप्पा : 13 मे 2024
- पाचवा टप्पा : 20 मे 2024
- सहावा टप्पा : 25 मे 2024
- सातवा टप्पा : 1 जून 2024
General Election to Lok Sabha 2024- State wise data in each Phase#ECI #GeneralElections2024 #MCC pic.twitter.com/HPVrb23Bh7
— Election Commission of India (@ECISVEEP) March 16, 2024
Lok Sabha Elections 2024 : विविध टप्प्यांमध्ये मतदान होणारी राज्ये
एका टप्प्यात मतदान होणारी राज्ये (19 एप्रिल 2024)
22 राज्यांमध्ये एका टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे.
दोन टप्प्यात मतदान होणारी राज्ये
कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर राज्यांमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडेल.
तीन टप्प्यात मतदान होणारी राज्ये
छत्तीसगड आणि आसाममध्ये तीन टप्प्यात लोकसभा निवडणूक होईल.
चार टप्प्यात मतदान होणारी राज्ये
ओदिसा, मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये चार टप्प्यात मतदान घेण्यात येईल.
पाच टप्प्यात मतदान होणारी राज्ये
महाराष्ट्रासह जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
सात टप्प्यात मतदान होणारी राज्ये
उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
SCHEDULE OF Bye Elections in 26 ACs along with #GE2024.
— Election Commission of India (@ECISVEEP) March 16, 2024
Details 👇#ECI #Elections2024 #ElectionSchedule #MCC pic.twitter.com/G05xPXZpO9
विविध राज्यांतील लोकसभा निवडणुकीच्या तारखा : 19 एप्रिल ते 1 जून
- महाराष्ट्र : 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी पाच टप्प्यात मतदान
- राजस्थान : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात 19 आणि 26 एप्रिल रोजी मतदान
- उत्तर प्रदेश : 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी सात टप्प्यात मतदान
- दिल्ली : 25 मे रोजी मतदान
- मध्य प्रदेश : 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे आणि 13 मे रोजी चार टप्प्यांत मतदान
- मणिपूर : 19 आणि 26 एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान
- कर्नाटक : 26 एप्रिल आणि 7 मे रोजी दोन टप्प्यात मतदान
- पंजाब : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान
- हिमाचल प्रदेश : सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान
- ओदिशा : 13 मे, 20, 25 आणि 1 जून रोजी चार टप्प्यांत मतदान
- झारखंड : 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान
- हरियाणा : सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान
- उत्तराखंड : पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान
- पश्चिम बंगाल : 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान सात टप्प्यांत मतदान
- आसाम : 19, 26 एप्रिल आणि 7 मे रोजी मतदान
- गुजरात : 7 मे रोजी मतदान
2024 Elections Date : देशात सात टप्प्यात निवडणूक होणार, निवडणूक आयोगाची घोषणा, पाहा व्हिडीओ
महत्त्वाच्या इतर बातम्या :