Balasahebanchi Shiv Sena: भाजपचं मिशन 45 मग शिंदे गटाचं काय? एकनाथ शिंदे काय रणनीती आखणार?
Balasahebanchi Shiv Sena: भाजपच्या मिशन 45 नंतर लवकरच बाळासाहेबांची शिवसेना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्लॅन बनवत आहे. ज्यामध्ये आपल्या पक्षाची बांधणी आणि भविष्यात निवडणुका यासाठी फायदा होईल
![Balasahebanchi Shiv Sena: भाजपचं मिशन 45 मग शिंदे गटाचं काय? एकनाथ शिंदे काय रणनीती आखणार? Lok Sabha Election 2024 bjp plan MISSION 45 what about eknath shinde Balasahebanchi Shiv Sena Balasahebanchi Shiv Sena: भाजपचं मिशन 45 मग शिंदे गटाचं काय? एकनाथ शिंदे काय रणनीती आखणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/b8fd0b47c1e8142e5485b80036eefd5b1672403230796528_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lok Sabha Election 2024: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रत्येक पक्षानं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभेसाठी भाजपनं मिशन 45 सुरु केलेय. भाजपनं मिशन 45 सुरु केलं आणि इतर पक्षाचे दाबे दणाणून गेले. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना सध्या युतीत आहे पण नेमकं हे मिशनं आहे तरी कसं? बाळासाहेबांच्या शिवसेनेचं काय होणार याचीच चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 45 खासदार हवेयत. भाजप शिंदेसोबत सत्तेत आहे. मग शिंदेच्या खासदारांचं काय? अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरु झाली आहे. याबाबत जाणून घेऊयात..
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने 'मिशन 144' सुरु केलं आहे. यामध्ये निवडणुकीत भाजपला विजय मिळालेला नव्हता अशा देशातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत करण्यास सुरू केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील 144 मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांनी दौरे केले आहेत. महाराष्ट्रात भाजपचे 'मिशन 45' ठेवलं आहे. याच मिशनसाठी काही केंद्रीय मंत्र्यांचे दौरे लोकसभा मतदारसंघात पार पडले आहेत. आता भाजपचे प्रमुख नेते देशातील या 144 मतदारसंघात दौरे करणार असून निवडणुकीची रणनीती आखणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद आणि चंद्रपूर येथे जे.पी.नड्डा यांची सभा झाली. तर आता जे पी नड्डा महिनाभरातच पुन्हा पुण्यात येणार आहेत. अन् मिशन 45 ला पुढे भरारी देणार आहेत. त्यामुळे मित्र पक्षांच्या मतदारसंघातील भाजपचा हवा करण्याचा प्लॅन आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार राज्यात निवडून आले होते. त्यावेळी एनडीएत असलेल्या शिवसेनेने भाजपासोबत एकत्र निवडणूक लढवली होती. आता शिवसनेचे 13 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. तर उद्धव ठाकरेंकडे फक्त पाच खासदार उरले आहेत. त्यात शिंदे गटाचे तेरा खासदार असलेल्या मतदारसंघात ही भाजपने मिशन 45 सुरू केलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे गटाच्या तेरा खासदारांची पुढे गोची होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
कोण आहेत बाळासाहेबांच्या शिवसेनेतील खासदार ?
गजानन किर्तिकर – मुंबई उत्तर पश्चिम
राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य
हेमंत गोडसे – शिवसेना
राजेंद्र गावित – पालघर
धैर्यशील माने – हातकणंगले
संजय मंडलिक – कोल्हापूर
सदाशीव लोखंडे – शिर्डी
भावना गवळी- यवतमाळ-वाशिम
श्रीरंग बारणे – मावळ
श्रीकांत शिंदे – कल्याण
प्रतापराव जाधव – बुलढाणा
कृपाल तुमाने – रामटेक
हेमंत पाटील – हिंगोली
भाजपच्या मिशन 45 नंतर लवकरच बाळासाहेबांची शिवसेना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्लॅन बनवत आहे. ज्यामध्ये आपल्या पक्षाची बांधणी आणि भविष्यात निवडणुका यासाठी फायदा होईल. शिंदे गटातील तेरा खासदारांच्या मतदार संघात विशेष लक्ष यामध्ये दिलं जाणार आहे. आणि खासदार आणि पक्षाचे काम पोहोचवलं जाणार आहे. शिंदे गटाने देखील युती झाली नाही तर काही पर्यायी मार्ग देखील ठेवलेले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने एकत्रित येत महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपूर्वी सत्ता स्थापन केलीय खरी मात्र भाजप या मित्र पक्षांच्या मतदारसंघातही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करत आहे. मात्र भाजप पक्ष नेत्यांच म्हणणं आहे की आम्ही जी तयारी करत आहोत. ती पुढील काळात आमच्याच मित्र पक्षातील खासदारांना उपयोगी पडेल. पण खरंच याचा फायदा बाळासाहेबांच्या शिवसेनेला होईल का? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)