2014, 2019 मध्ये भाजप-काँग्रेसमध्ये थेट होती लढत; निकाल फारच धक्कादायक, 2024 मध्ये कोण मारणार बाजी?
2019 मध्ये 12 राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत होती. सुमारे 200 जागांवर दोन राष्ट्रीय पक्षांपैकी एक विजयी आणि दुसरा उपविजेता ठरला. 2024 मध्ये विरोधकांची एकजूट असलेली इंडिया भाजपवर भारी पडणार का?

Lok Sabha Election 2024: देशात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका 2024 (Lok Sabha Election 2024) साठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस (Congress) यावेळी भाजपला (BJP) टक्कर देणार का? भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला (NDA) सत्तेतून हद्दपार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली विरोधकांची इंडिया आघाडी 2024 मध्ये आपली जादू दाखवून भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार? या सर्व शक्यता असतानाच गेल्या दोन लोकसभा निवडणुकांचे आकडे लक्षात घेणं गरजेचं आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या आकड्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली होती.
गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत यंदा मात्र काँग्रेसचं समीकरण काहीसं बदललेलं आहे. यावेळी काँग्रेसला विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. या विरोधी पक्षांमध्ये अनेक अशा पक्षांचा समावेश आहे, ज्यांचं देशातील अनेक राज्यांमध्ये स्वतःचं सरकार आहे. 2019 मध्ये केवळ 52 जागांवर मर्यादित राहिलेल्या काँग्रेसच्या 2014 च्या तुलनेत 8 जागांची वाढ झाली आहे. मात्र, या दोन्ही निवडणुकांमध्ये देशातील सर्वात जुन्या पक्षांची मतं 20 टक्क्यांच्या जवळपास राहिली. गेल्या निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर लोकसभेच्या अशा एकूण 192 जागा होत्या, ज्यावर भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत झाली होती.
2014 च्या निवडणुकीत फरकानं विजय
विजयाबद्दल बोलायचं झालं तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. तसेच, या निवडणुकीत पक्षाच्या विजयाचं मार्जिन 13.6 टक्के होतं. तर 2014 च्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये एकूण 189 जागांवर थेट लढत झाली होती. दोघांमधील या लढतीत भाजपला एकूण 166 जागा जिंकता आल्या. इतर जागांवर काँग्रेस जिंकली किंवा दुसऱ्या स्थानावर राहिली. या जागांवर भाजपच्या विजयाची टक्केवारी 88 टक्के होती.
2019 मध्ये काँग्रेस फक्त 52 जागांवरच मर्यादित
2019 च्या लोकसभा निवडणुकीत 12 राज्यांतील 192 जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती. ज्यामध्ये भाजपनं 176 जागा जिंकल्या, तर देशातील सर्वात जुना पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. या जागांवर भाजपच्या विजयाचा स्ट्राइक रेट 92 टक्के होता. या संदर्भात, 2014 च्या तुलनेत भाजपनं काँग्रेसशी समोरासमोरच्या लढतीत चांगली कामगिरी केली.
काँग्रेसची कामगिरी
2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस एकतर जिंकली किंवा एकूण 268 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आली. 2019 मध्ये, पक्षानं 262 जागा जिंकल्या, तर 2009 मध्ये 350 जागा जिंकल्या किंवा दुसऱ्या स्थानावर होत्या. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत देशातील 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. ही राज्य म्हणजे आंध्र प्रदेश, त्रिपुरा, राजस्थान, नागालँड, हिमाचल, गुजरात, हरियाणा, मणिपूर, सिक्कीम, दिल्ली इत्यादी.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
