सत्तेचा अहंकार डोक्यात गेलेल्यांना लोकं स्वीकराणार नाहीत, लातूरमध्ये काँग्रेस-वंचित आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, अमित देशमुखांना विश्वास
काँग्रेस वंचित आघाडीला लातूर महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास काँग्रेस आदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
Amit Deshmukh Latur Mahanagar Palika election : निवडणुकीत विलासराव देशमुख यांच्या बद्दल बोलणं दुर्दैवी होतं. त्यामुळे सामान्य माणसांच्या भावना दुखावल्या गेल्याचे मत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले. रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेलं वक्तव्य चुकीचं होतं असे देशमुख म्हणाले. लातूरच्या अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा स्थानिक अस्मिता उफाळून येते असेही देशमुख म्हणाले. सत्तेचा अहंकार डोक्यात असेल तर ते लोकांनी स्वीकारलं नाही, मलाही ते जाणवलं , निकालात ते दिसेल असे देशमुख म्हणाले. रवींद्र चव्हाण यांच्या विलासराव देशमुख यांच्या बद्दलच्या वक्तव्यावर अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस आणि वंचित बहुजन विकास आघाडी ही एक चाचणी
रवींद्र चव्हाण यांच्या विलासराव देशमुख यांच्या बद्दलच्या वक्तव्यावर अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर आणि राहुल गांधी एकत्र येण्याला ही निवडणूक निमित्त, या निवडणुकीत यश मिळालं तर नवा पर्याय उभा राहण्यासाठी सुरुवात होईल असेही अमित देशमुख म्हणाले. काँग्रेस आणि वंचित बहुजन विकास आघाडी ही एक चाचणी आहे. लातूर महानगरपालिकेतील भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिरंगी लढतीवर अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसला रोखण्यासाठी लातूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी वेगळी लढणार याची कल्पना होती असेही देशमुख म्हणाले. काँग्रेस वंचित आघाडीला लातूर महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
लातूर शहर महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी मतदान
लातूर महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर होत आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी 60 टक्के मतदान झालं होतं. लातूर महानगरपालिकेत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मुख्य लढत झाली होती. या पालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होती. एकूण सर्व पक्षांचे मिळून 369 उमेदवार रिंगणात होते. एकूण 70 जागांपैकी विजयासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. 36 हा बहुमताचा आकडा आहे.
लातूर महानगरपालिका निवडणुकीत एकूण 70 जागांसाठी 369 उमेदवार रिंगणात आहेत. पालिकेवर सत्ता काबिज करण्यासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत काँग्रेस 65, वंचित बहुजन आघाडी 5 जागा लढवत आहे. या दोन्ही पक्षांची युती आहे. त्याचबरोबर भाजप 70 जागा लढवत आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट 60 जागांवर निवडणूक लढवत आहे.
महत्वाच्या बातम्या:




















