एक्स्प्लोर

Kudal Assembly constituency : अर्जाची छाननी सुरु असताना कुडाळमध्ये ठाकरे अन् शिंदेंचे सैनिक भिडले, निवडणूक निर्णय अधिकारी दालन सोडून बाहेर पडल्या

Kudal Assembly constituency 2024 : कुडाळ मालवणमध्ये ठाकरे गटाचे आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.

Kudal Assembly constituency 2024 : कुडाळ - मालवण विधानसभा मतदार संघाची उमेदवार अर्ज छाननी प्रक्रिया शांतपणे सुरू असतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाखाली महायुती (Mahayuti) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena) पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांत जोरदार बाचाबाची झाली आहे. दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांनी समजूत काढत हे प्रकरण शांत केले आहेत. 

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी युतीच्या कार्यकर्त्याला विचारला जाब 

निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूसे आपले दालन सोडून खाली आल्या त्यांनी पोलीसांना दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याच्या सूचना दिल्या. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या अर्ज सुनावणी वेळी एका अपक्ष उमेदवाराच्या अर्जाला आक्षेप घेत त्या उमेदवाराच्या एका सूचकाची सही खोटी मारल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्याने ती सही आपली नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी एक तासाचा वेळा दिला. त्याप्रमाणे ते प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी संबंधित सूचक प्रांताधिकारी कार्यालयात जात असता युतीच्या एका कार्यकर्त्यांने त्याला आत जाण्यास विरोध करीत अडवीत धक्काबुक्की केली. यावेळी बाहेर थांबलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आत येत युतीच्या त्या कार्यकर्त्याला जाब विचारला.

कुडाळ मालवणमध्ये निलेश राणे अन् वैभव नाईक आमने-सामने 

कुडाळ मालवण विधानसभा (Kudal Malvan Vidhansabha Election) मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे निलेश आणि ठाकरेंचे शिवसैनिक आमने-सामने असणार आहेत. कुडाळ मालवणमधून निवडणूक लढण्यासाठी निलेश राणे यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला आहे. महायुतीच्या जागा वाटपात कुडाळ-मालवणची जागा शिवसेनेला जाणार असल्याने राणेंनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदा राणे आणि वैभव नाईक हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने असणार आहेत. 

निलेश राणे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून मैदानात

निलेश राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून यापूर्वी वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी नारायण राणेंचा (Narayan Rane) पराभव केला होता. शिवाय, त्यानंतर नारायण राणे मुंबईतील वांद्रे विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत मैदानात उतरले होते. त्यावेळीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sada Sarvankar : बाळासाहेब असते तर नातेवाईकांसाठी जागा सोडायला सांगितली नसती, सदा सरवणकरांची राज ठाकरेंना विनंती, म्हणाले...

Mahavikas Aaghadi Candidate List : 5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत, महाविकास आघाडीची 288 मतदारसंघातील उमेदवारांची यादी एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Boisar Blast: बोईसरमध्ये चाळीतील घरात गूढ स्फोट; पत्र्याचं जाडजुड कपाट चेपलं, सिमेंटची भिंत कोसळली
बोईसरच्या चाळीतील घरात गूढ स्फोट; पत्र्याचं जाडजुड कपाट चेपलं, सिमेंटची भिंत कोसळली
अजितदादांनी आर. आर. आबांविषयीची वक्तव्य करुन आफत ओढावून घेतली? सिंचन घोटाळाप्रकरणी लढा देणाऱ्या संघटनेची सूचक प्रतिक्रिया
अजितदादांनी आर. आर. आबांविषयीची वक्तव्य करुन आफत ओढावून घेतली? सिंचन घोटाळाप्रकरणी लढा देणाऱ्या संघटनेची सूचक प्रतिक्रिया
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Vijay Shivtare: लोकसभेला तह केला, पण विधानसभेला पुरंदरमध्ये विजय शिवतारेंविरोधात अजितदादा गटाचा उमेदवार रिंगणात
लोकसभेला तह केला, पण विधानसभेला पुरंदरमध्ये विजय शिवतारेंविरोधात अजितदादा गटाचा उमेदवार रिंगणात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 31 October 2024Smita Patil On Ajit Pawar : आबांबद्दल अजित पवार असं वक्तव्य करतील असं वाटलं नव्हतंJanmanch On Sinchan Ghotala : सिंचन घोटाळ्यात काहीतरी आढळलं असावं,  जनमंचची सूचक प्रतिक्रियाVarsha Bunglow Meeting : वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Boisar Blast: बोईसरमध्ये चाळीतील घरात गूढ स्फोट; पत्र्याचं जाडजुड कपाट चेपलं, सिमेंटची भिंत कोसळली
बोईसरच्या चाळीतील घरात गूढ स्फोट; पत्र्याचं जाडजुड कपाट चेपलं, सिमेंटची भिंत कोसळली
अजितदादांनी आर. आर. आबांविषयीची वक्तव्य करुन आफत ओढावून घेतली? सिंचन घोटाळाप्रकरणी लढा देणाऱ्या संघटनेची सूचक प्रतिक्रिया
अजितदादांनी आर. आर. आबांविषयीची वक्तव्य करुन आफत ओढावून घेतली? सिंचन घोटाळाप्रकरणी लढा देणाऱ्या संघटनेची सूचक प्रतिक्रिया
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Vijay Shivtare: लोकसभेला तह केला, पण विधानसभेला पुरंदरमध्ये विजय शिवतारेंविरोधात अजितदादा गटाचा उमेदवार रिंगणात
लोकसभेला तह केला, पण विधानसभेला पुरंदरमध्ये विजय शिवतारेंविरोधात अजितदादा गटाचा उमेदवार रिंगणात
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात रजत दलालची जीभ घसरली, ईशा सिंहबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; बिग बॉसने पितळं उघडं पाडलं
बिग बॉसच्या घरात रजत दलालची जीभ घसरली, ईशा सिंहबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; बिग बॉसने पितळं उघडं पाडलं
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
Embed widget