Sada Sarvankar : बाळासाहेब असते तर नातेवाईकांसाठी जागा सोडायला सांगितली नसती, सदा सरवणकरांची राज ठाकरेंना विनंती, म्हणाले...
Sada Sarvankar : शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी एक्सवर पोस्ट करुन राज ठाकरे यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. सरवणकर यांनी बाळासाहेब ठाकरेंचा दाखला दिला आहे.
मंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करुन भावनांना वाट मोकळी करुन दिली. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करत सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंना विनंती केली आहे. सदा सरवणकर यांनी बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाखला देत सरवणकर यांनी हे आवाहन केलं.
सदा सरवणकर म्हणाले, मी चाळीस वर्षापासून शिवसेनचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहीमचा आमदार झालो.
बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर - माहिम मधे राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते, असं सदा सरवणकर म्हणाले.
एकनाथ शिंदे साहबांकडे पाहा त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैकनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या, असं सदा सरवणकर म्हणाले.
राज ठाकरेंबद्दल आदर, त्यांनी पाठिंबा द्यावा
राज ठाकरे प्रचंड मोठे नेते आहेत, मला त्यांच्याबद्दल आदर आहे. या मतदारसंघासाठी 30 वर्ष काम करतोय, या मतदारांशी जिव्हाळ्याचं नातं बनलं आहे. इथल्या मतदारांशी आईचं नातं आहे, ते तोडू नये, अशी विनंती आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी तीन वेळा निवडून आलेल्या खासदार मुलाला मंत्री न करता निष्ठावंत शिवसैनिकाला संधी दिली. तशीच भूमिका राज ठाकरेंनी घ्यावी, असं सदा सरवणकर म्हणाले. सर्वसामान्य शिवसैनिकाला आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती करतो,असं सरवणकर म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असं वाटत होतं की हे कुठंतरी थांबून माझ्या सारख्या शिवसैनिकाला आशीर्वीद द्यावेत, असं वाटत होतं. मुख्यमंत्र्यांना असं वाटत होतं की खेळीमेळीच्या वातावरणात हे सर्व झालं असतं तर बरं झालं असतं. मतदारांच्या आग्रहामुळं या ठिकाणाहून माघार घेणं फार कठीण होत आहे, असं सरवणकर यांनी सांगितलं.
मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो.
— Sada Sarvankar (@misadasarvankar) October 30, 2024
बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर - माहिम मध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य…
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे, असं स्पष्ट मत भाजपचं होतं आणि आहे. राज ठाकरेंनी त्याठिकाणी आम्हाला मागच्या निवडणुकीत पाठिंबा दिला. राज ठाकरे एका ठिकाणी मदत मागत असतील तर दिला पाहिजे. एकनाथ शिंदे यांचं देखील मत होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील नेत्यांचं मत असं होतं की ते जर लढले नाहीत तर तिथली मतं उबाठाकडे जातील त्यामुळं ते तयार झाले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इतर बातम्या :