एक्स्प्लोर

Vinod Tawde: विनोद तावडेंच्या डायरीमध्ये 15 कोटींची नोंद; क्षितिज ठाकूरांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Vinod Tawde Hitendra Thakur In Virar: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूर यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

Vinod Tawde In Virar: भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) विरारमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला आहे. विरार पूर्वेला असणाऱ्या मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. याठिकाणी पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला.

विवांत हॉटेलमध्ये विद्यामान आमदार क्षितिज ठाकूर देखील उपस्थित होते. यावेळी विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूर यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. तसेच विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन आले होते. त्यांच्यासोबत डायऱ्या देखील होत्या, असा दावा क्षितिज ठाकूर यांनी केला. विनोद तावडे यांच्याकडे डायऱ्या सापडल्या, त्यामध्ये 15 कोटींची नोंद असल्याचा क्षितिज ठाकूर यांनी आरोप केला आहे. सदर घटनेनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपचा खेळ खल्लास...जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी केले. निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांची गाडी तपासली-

विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांची गाडी तपासली. ठाकूरांचे कार्यकर्ते गाडी तपासण्यासाठी मागत आहेत. मात्र आयोगाच्या टीमने गाडी तपासल्यानंतर कार्यकर्त्यांनीच काही गैरप्रकार केला तर काय, असं विनोद तावडेंच्या टीमचं म्हणणं आहे. 

सदर घटनेवर हितेंद्र ठाकूर काय म्हणाले?

5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते. तसेच दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत. यामध्ये पैशांचं वाटप कसं केलं, याची माहिती होती. याबाबत सदर ठिकाणी पोलीस पोहचले आहेत. आम्ही तक्रार केली आहे. परंतु पुढे काय होणार या तक्रारीचं हे माहिती आहे. याचं सरकार आहे, असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मला विनोद तावडे मला सारखे फोन करतायत. मला सोडवा..माझी चूक झाली..मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. 

संबंधित बातमी:

Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
Sunny Leone : सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं, विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं, विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 5 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis on Pradhan Mantri Awas Yojana : महाष्ट्रातील 20 लाख गरिबांना घरं मिळणार - फडणवीसRahul Gandhi Meet Vijay Wakode Family : राहुल गांधींकडून विजय वाकोडेंना श्रद्धांजली अर्पणMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 23 Decmber 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
Sunny Leone : सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं, विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं, विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
ते इतक्या विश्वासाने सांगताय जसं काही ते प्रत्यक्ष साक्षीदारच होते; राहुल गांधींच्या गंभीर आरोपानंतर भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
राहुल गांधींच्या गंभीर आरोपांना सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, देवाचे अक्षरशः आभारच मानले पाहिजे, कारण....
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
Pooja Khedkar : फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
Dada Bhuse : ...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
Embed widget