एक्स्प्लोर

हा गावचा सरपंच आहे की देशाचा पंतप्रधान हेच समजत नाही; उद्धव ठाकरेंचा मोदी अन् भाजपला टोला

Kolhapur Election : भाजपच्या पोस्टर्सवरून वाजपेयी, अडवाणी गायब होऊन एकाच माणसाचा फोटो वापरला जातोय. त्यामुळे सरपंच कोण आणि पंतप्रधान कोण हेच समजत नाही. 

कोल्हापूर: देशात भाजपने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला, लोकांनी त्याला झिटकारलं. भाजपकडून पंतप्रधानपदासापासून ते सरपंचपदासाठी एकच फोटो वापरला जातोय, त्यामुळे सरपंच कोण आणि पंतप्रधान कोण हेच समजत नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. ते कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करत होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "देशात भाजपने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला, लोकांनी त्याला झिटकारलं. हिंदूहृदयसम्राट म्हटल्यावर लोकांच्या समोर एकच नाव येतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हिंदू अडचणीत असताना कोणतीही पर्वा न करता मदतीला जाणारा म्हणजे हिंदूहृदयसम्राट होय. भाजपचा भगवा हा खरा भगवा नाही, नकली भगव्याचा बुरखा हा फाडायला हवा."

नवी मुंबई एअरपोर्टला नाव देताना बाळासाहेबांच्या नावाला का विरोध केला असा सवाल मुख्यमंत्र्यांनी भाजपला विचारला. समृद्धी महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव महाविकास आघाडी सरकारने दिलं आहे असं ते म्हणाले. 

शिवसेनेने कधी झेंडा बदलला नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 1966 साली शिवसेना जन्माला आली. तेव्हापासून शिवसेनेने कधी झेंडा, रंग किंवा नेता बदलला नाही. तुमच्या सोयीप्रमाणे भगवा वापरालं तर खरा भगवा नव्हे. हिंदुत्वाची दिशा बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवली होती. आता कुठं अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी पोस्टरवर दिसतात का? सगळीकडे फक्त एकच फोटो दिसतो. 

बेळगावमधला भगवा यांनी खाली उतरवून नकली भगवा चढवला. खोटं बोलून चार राज्यात तुमचं चाललं असेल...पण इथं नाही चालणार असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे. 

येत्या 12 तारखेला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी मतदान आहे. त्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. 

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full EP : औरंगजेबाच्या कबरीचं काय करावं? का होतेय कबर काढून टाकण्याची मागणी? सखोल चर्चाNagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहनNagpur Violance : आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक, दोघं जखमीNagpur Violence : नागपूरमधील शिवाजी चौकात दोन गटात राडा, पोलिसांकडून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget