एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कोल्हापुरात राजेंद्र पाटील यड्रावकर, राहुल आवाडे, अशोकराव मानेंना मोठी आघाडी, कागलमध्ये चुरशीची लढत! कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची पिछाडी

Kolhapur District Assembly Constituency Election : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये धक्कादायक निकालांची नोंद होण्याची शक्यता आहे.

Kolhapur District Assembly Constituency Election : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये धक्कादायक निकालांची नोंद होण्याची शक्यता आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर 15781 मतांनी पुढे चालले असून त्यांनी मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिवसेना शिंदे गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. हातकणंगलेमधून जनसुराज्यच्या अशोकराव माने यांनी 8200 मतांची आघाडी घेतली आहे. अशोकराव माने यांच्या विरोधात काँग्रेसचे राजू बाबा आवळे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ते पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. 

करवीरमधून तिसऱ्या फेरीत चंद्रदीप नरके यांना 6 हजार 500 मतांनी आघाडी मिळाली आहे. या ठिकाणी काँग्रेसचे राहुल पाटील यांची लढत होत आहे. चंदगडमध्ये बहुरंगी लढतीमध्ये भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील यांनी आघाडी घेतली असन चौथ्या फेरी अखेर 3500 मतांनी आघाडी घेतली आहे. शाहूवाडीमध्ये धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता असून चौथ्या फेरी अखेर सत्यजित पाटील यांनी घेतलेली आघाडी कायम राखली आहे. त्यांनी 1651 मतांची आघाडी घेतली आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये शहरी मतदानामध्ये अमल महाडिक यांनी आघाडी घेतली असून पाचव्या फेरी अखेर महाडिक 5975 मताने आघाडीवर आहेत. इचलकरंजीमध्येही भाजप उमेदवार राहुल आवाडे यांनी मोठी आघाडी घेतली असून 11,977 मतांनी आघाडी घेतली आहे. चौथ्या फेरी अखेर राहुल आवाडे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. कागलमध्ये चुरशीची लढत होत असून सातव्या फेरीअखेर हसन मुश्रीफ यांच्याकडे अवघ्या 2104 मतांची आघाडी आहे. त्यामुळे कागलमध्ये हसन मुश्रीफ समरजीत घाटगे यांच्यामध्ये मोठी चुरस असल्याचे दिसून येत आहे. राधानगरीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा घेतलेली आघाडी कायम आहे. 

  • कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर 2959 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
  • राधानगरी मधून प्रकाश अबिटकर 6800 आघाडीवर 
  • कागलमधून हसन मुश्रीफ 2104 मतांनी आघाडीवर (सातवी फेरी)
  • इचलकरंजी मधून राहुल आवाडे 11977  मतांनी आघाडीवर (चौथी फेरी )
  • कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 5975 मतांनी आघाडीवर (पाचवी फेरी )
  • शिरोळ मधून राजेंद्र पाटील यड्रावकर 15781 मतांनी (पाचवी फेरी)
  • शाहूवाडी सत्यजित पाटील 1651 आघाडीवर (चौथी फेरी)
  • चंदगडमधून शिवाजी पाटील 3500  मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
  • करवीरमधून चंद्रदिप नरके 6500 मतांनी आघाडीवर (तीसरी फेरी)
  • हातकणंगले मधून अशोकराव माने 8200 मतांनी आघाडीवर (तीसरी फेरी)

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरूABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Embed widget