एक्स्प्लोर

Kerla Election Result 2026: केरळमध्ये काँग्रेसने भाजपचे मनसुबे उधळले, दणदणीत यश, कोणाला किती जागा?

Kerla Election Result 2026: काँग्रेसला केवळ केरळमध्ये मोठे यश मिळताना दिसत आहे. केरळमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे.

Kerla Election Result 2026: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि  आसाम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सकाळी आठ वाजता या पाचही राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालांमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारल्याचे दिसून आले. सध्याच्या कलानुसार पश्चिम बंगाल (West Bengal Election 2026) आणि आसाममध्ये भाजपला (BJP) मोठे यश मिळताना दिसत आहे. मात्र, काँग्रेस आणि डाव्यांचा गड असलेल्या केरळमध्ये भाजपला फारसे यश मिळताना दिसत नाही. केरळ विधानसभेच्या (Kerla Assembly Election Result 2026) एकूण 140 जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेसप्रणित युडीएफ आघाडी 83, डावी आघाडी 53 आणि भाजपचे अवघे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. केरळमध्ये बहुमतासाठी 70 ही मॅजिक फिगर आहे. सध्याच्या कलानुसार, काँग्रेसचे 72 उमेदवार आघाडीवर आहेत. (Assembly Election Results 2026)

सध्याची परिस्थिती पाहता केरळमध्ये काँग्रेसप्रणित युडीएफ आघाडीचे सरकार येण्याची दाट शक्यता दिसत आहे. त्यामुळे केरळमधील काँग्रेस पक्षसंघटनेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळमधील काँग्रेस मुख्यालयात सध्या कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. हे कार्यकर्ते टीव्ही स्क्रीनवरील निकाल पाहून टाळ्या वाजवून जल्लोष करताना दिसत आहेत. यापूर्वी केरळमध्ये डाव्यांचे सरकार होते. भाजपने यंदाच्या निवडणुकीत केरळमध्ये बरीच ताकद लावली होती. मात्र, या निवडणुकीत सध्या काँग्रेस बाजी मारताना दिसत आहे. 

Tamilnadu Election Result 2026: तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर, थलपती विजयचा टीव्हीकेची मोठी मुसंडी 

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. या निवडणुकीत द्रमुक व अण्णाद्रमुक यांच्यात मुख्य लढत असेल, असा अंदाज होता. मात्र, या निवडणुकीत अभिनेता थलपती विजय याच्या टीव्हीके पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांपैकी द्रमुक 52, अण्णाद्रमुक 65 तर टीव्हीके पक्षाचे उमेदवार 100 जागांवर आघाडीवर आहेत.

आणखी वाचा

West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : पश्चिम बंगालच्या मतमोजणीला पहिला कल हाती, तृणमूल काँग्रेस 112 आणि भाजप 130 जागांवर आघाडीवर

Tamil Nadu Kerala Puducherry Election Results LIVE: DMK पुन्हा सत्तेत येईल, की AIADMK विजयी ठरेल? मतमोजणीला सुरुवात

महत्त्वाच्या बातम्या

नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget