Karnataka Exit Poll: कर्नाटकात कुणालाही बहुमत नाही... कुमारस्वामी पुन्हा किंगमेकरच्या भूमिकेत येणार? वाचा एक्झिट पोल काय सांगतोय
ABP News C voter Karnataka Exit Poll: कर्नाटकातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं असून 13 तारखेला निकाल लागणार आहे.
ABP News C voter Karnataka Exit Poll: कर्नाटकातील मतदान आज संपलं असून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. एबीपी न्यूज सी व्होटरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचं स्पष्ट आहे. काँग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरणार असून त्याला 100 ते 112 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सत्ताधारी भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहणार असून त्याला 83 ते 95 जागांवर समाधान मानावं लागणार असल्याची शक्यता आहे. तर जेडीएसला 21 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे.
एबीपी न्यूज सी व्होटरच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कोणत्याच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. पण काँग्रेस बहुमताच्या जवळ जाऊ शकते. काँग्रेसला 100 ते 112 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप राहणार असून भाजपला 83 ते 95 जागा मिळण्याची शक्यता आहे.
कुमारस्वामी पुन्हा किंगमेकर होणार?
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, धर्मनिरपक्ष जनता दल म्हणजे जेडीएसला 21 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे. जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर कुमारस्वामी पुन्हा एकदा किंग मेकरच्या भूमिकेत असणार आहेत. 2017 साली अशीच परिस्थिती असताना कुमारस्वामींनी काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती.
कर्नाटकमध्ये कुणाला किती जागा?
एकूण जागा - 224
बहुमत - 113
काँग्रेस - 100 ते 112
भाजप - 83 ते 95
जेडीएस - 21 ते 29
इतर - 2 ते 6
एक्झिट पोलनुसार, कर्नाटकातील ग्रेटर बेंगळुरू प्रदेशात काँग्रेसला 39 टक्के मतांसह 11-15 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर भाजपला 45 टक्के मतांसह 15-19 जागा मिळू शकतात. जेडीएसला 13 टक्के मतांसह 1-4 जागा मिळतील. दुसरीकडे, 3 टक्के मतांसह 0-1 जागा इतरांच्या खात्यात जात आहेत.
ग्रेटर बंगलोर प्रदेशात कोणाला किती मते मिळण्याची शक्यता? (32 जागा)
- भाजप- 45%
- काँग्रेस - 39%
- JDS- 13%
- इतर - 3%
ग्रेटर बंगलोर प्रदेशात कोणाला किती जागा मिळण्याची शक्यता?
- भाजप-15-19 जागा
- INC-11-15 जागा
- JDS-1-4 जागा
- इतर-0-1 जागा
एक्झिट पोलनुसार, कर्नाटकातील ओल्ड म्हैसूर भागात काँग्रेस आणि जेडीएसमध्ये लढत दिसून येत असून भाजप पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. काँग्रेसला 28-32 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 0-4 जागा मिळू शकतात. जेडीएसला 19-23 जागा मिळतील. दुसरीकडे 0-3 जागा अपक्षांच्या खात्यात जाताना दिसत आहेत.
ओल्ड म्हैसूर प्रदेशात कोणाला किती जागा मिळतील? (55 जागा)
- भाजप- 0-4 जागा
- INC- 28-32 जागा
- JDS- 19-23 जागा
- इतर- 0-3 जागा
जुन्या म्हैसूर भागात कोणाला किती मते मिळाली?
- भाजप- 26%
- काँग्रेस- 38%
- JDS- 29%
- इतर- 7%
एक्झिट पोलनुसार, मध्य कर्नाटक भागात काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत दिसून येत आहे. काँग्रेसला येथे 18-22 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 12-16 जागा मिळू शकतात. जेडीएसला 0-2 जागा मिळताना दिसत आहेत. दुसरीकडे 0-1 जागा इतरांच्या खात्यात जात आहेत.
मध्य कर्नाटक विभागात कोणाला किती जागा मिळतील? (35 जागा)
- भाजप- 12-16 जागा
- INC- 18-22 जागा
- JDS- 0-2 जागा
- इतर- 0-1 जागा
मध्य कर्नाटक विभागात कोणाला किती मते मिळाली?
- भाजप-39%
- काँग्रेस-44%
- JDS-10%
- इतर-7%