(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karnataka Assembly Election : तिकीट नाकारल्याने कर्नाटक भाजपमध्ये नाराजी, नेते, आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी; राजीनामा देणाऱ्यांची नावे काँग्रेसकडून जाहीर
Karnataka Election 2023 : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर कर्नाटकमध्ये खळबळ माजली असून राजीनाम्यांचा पाऊस होत आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. सोबतच कर्नाटकातील भाजपच्या ज्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांची यादी देखील दिली आहे.
Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election 2023) उमेदवार यादी (Candidate List) जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये (BJP) नाराजी असल्याची चर्चा आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं म्हटलं जात आहे. उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर कर्नाटकमध्ये खळबळ माजली असून राजीनाम्यांचा पाऊस होत आहे, असा दावा काँग्रेसने (Congress) केला आहे. सोबतच कर्नाटकातील भाजपच्या ज्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांची यादी देखील दिली आहे. यात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे निकवर्तीय डॉ. विश्वनाथ, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
काँग्रेसचं ट्वीट
काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर ही यादी जाहीर करत कर्नाटकात भाजप नेत्यांनी राजीनामा दिल्याचा दावा आहे. काँग्रेसने या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की,
पाहिलंत तुम्ही.. जे सांगितले होते ते झाले.
कर्नाटक भाजपमध्ये खळबळ, राजीनाम्यांचा पाऊस
• लक्ष्मण सवदी, माजी उपमुख्यमंत्री
• डीपी नरीबोल, माजी आमदार
• खासदार कुमारस्वामी, आ
• रामाप्पा लमाणी, आमदार
• गुलिहाटी शेखर, आमदार
• शंकर आर, एमएलसी
• एस. अंगारा, मंत्री
• येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय डॉ. विश्वनाथ
राज्यभरात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे सुरु आहेत
𝐍𝐎𝐓𝐄:हे ट्विट लिहीपर्यंत अनेक नेत्यांनी भाजप सोडल्याची माहिती आहे. ही यादी वेळोवेळी वाढत आहे, अपडेट करत राहू
देखा आपने.. जो कहा था, वही हुआ
— Congress (@INCIndia) April 13, 2023
कर्नाटक BJP में भगदड़, इस्तीफों की बारिश
• लक्ष्मण सावदी, Ex डिप्टी CM
• डी पी नारीबोल, Ex MLA
• एमपी कुमारस्वामी, MLA
• रामप्पा लमानी, MLA
• गुलिहट्टी शेखर, MLA
• शंकर आर, MLC
• एस अंगारा, मंत्री
• डॉ. विश्वनाथ, येदियुरप्पा के करीबी…
सवदी यांचा राजीनामा
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपच्या विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पारंपरिक मतदारसंघ अथणी या ठिकाणाहून सवदी यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचललं आहे. सवदी यांचा राजीनामा हा बेळगाव भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. सवदी यांच्या जागी भाजपने महेश कुमठल्ली यांना तिकीट दिलं आहे.
भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत 23 उमेदवारांचा समावेश आहे. याआधी भाजपने 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. भाजपने आतापर्यंत 224 पैकी 212 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. लवकरच भाजपकडून तिसऱ्या आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाईल.
विद्यमान आमदारांचा पत्ता कट, नवीन चेहऱ्यांना संधी
भाजपने आपल्या उमेदवार यादीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधई दिली आहे. पहिल्या यादीत 52 नव्या उमेदवारांना सामील केलं आहे. तर जवळपास नऊ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं आहे. यामध्ये अंगारा (सुलिया मतदारसंघ) आणि आनंद सिंह (विजयनगर मतदारसंघ) या मंत्र्यांचाही समावेश आहे. तर दुसऱ्या उमेदवार यादीत सात विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला आहे.